Agitation of Kolhapur Farmers against Nagpur Goa Shaktipeeth Expressway all party march to DM office  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरात हजारो शेतकरी एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय धडक मोर्चा

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानंतर आता नागपूर आणि गोव्याला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग सुरु होणार आहे.

Manish Jadhav

Nagpur Goa Shaktipeeth Expressway

मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानंतर आता नागपूर आणि गोव्याला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग सुरु होणार आहे. हा महामार्ग 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग हा जवळपास 800 किलोमीटरचा असणार आहे. या सुफरफास्ट हायवेमुळे नागपूर ते गोवा 11 तासांत गाठता येणार आहे. मात्र आता, हा महामार्ग प्रोजेक्ट रखडण्याची शक्यता असून, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, या 800 किलोमीटरच्या शक्तीपीठ सुपरफास्ट हायवेसाठी सध्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र कोल्हापूरमधून या प्रोजेक्टला कडाडून विरोध होऊ लागला आहे. लोक रस्त्यावर उतरुन या महामार्गाच्या विरोधात आंदोलन करु लागले आहेत.

प्रस्तावित प्रोजेक्टमध्ये जमिनी जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील शेतकरी याविरोधात रस्त्यावर आले आहेत. त्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी आपले आंदोलन सुरु केले आहे.

सध्या सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यायलावर धडक मोर्चा काढला. जिल्ह्यातील हजारो शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकवटले आहेत.

नागपूर-गोवा अंतर फक्त 11 तासांत पार होणार

दुसरीकडे, हा महामार्ग पूर्ण झाल्यास नागपूर ते गोवा अंतर फक्त 11 तासांत पार करता येणार आहे. राज्यातील सर्व शक्तीपीठांना जोडणारा 760 किलोमीटरचा सुपरफास्ट हायवे बांधण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यातून जातो. राज्य रस्ते विकाम महामंडळाने हा महामार्ग प्रस्तावित केला आहे. नागपूर ते गोवा अंतर जवळपास एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. नागपूरहून निघाल्यास गोव्याला पोहोचण्यासाठी तब्बल 22 तास लागतात. मात्र आता हा महामार्ग पूर्ण झाल्यास हे अंतर 11 तासांत पार करता येणार आहे. एवढेच नाहीतर या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या मालाला थेट पश्मि महाराष्ट्रासह कोकणातली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT