Nana Patole Dainik Gomantak
महाराष्ट्र

महागाईविरोधात काँग्रेसचे 31 मार्चला राज्यभर आंदोलन; नाना पटोलेंची माहिती

31 मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ सप्ताहाचे आयोजन

दैनिक गोमन्तक

Nana Patole: वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस 31 मार्चपासून राज्यभर आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला हैराण करणाऱ्या महागाईच्या विरोधात आवाज उठवत केंद्रातील झोपलेल्या भाजप सरकारला जागे करण्यासाठी येत्या 31 मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईतील टिळक भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या परिषदेला माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री अनीस अहमद, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष एम.एम.शेख उपस्थित होते. (agitation of Congress in maharshtra on March 31 against inflation says of Nana Patole

यावेळी नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, 'निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची हिंमत भाजपमध्ये (BJP) नव्हती, त्यामुळेच भाजपने निवडणुकीपर्यंत इंधन दरवाढ रोखून धरली होती. मात्र निवडणुका संपल्यानंतर लगेचच जनतेवर महागाईचा बोजा टाकण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 3.20 रुपयांनी महागले आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातही 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सीएनजी, पीएनजी गॅस आणि खाद्यतेलाच्या दरातही वाढ झाली आहे. 1 एप्रिलपासून औषधांच्या किमतीही वाढणार आहेत. जनता महागाईच्या खाईत लोटली जात आहे, मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारला जनतेच्या दु:खाशी आणि वेदनांशी काहीही देणेघेणे नाही.

राज्यभर निदर्शनाचे कार्यक्रम

पुढे नाना पटोले म्हणाले, 'मोदी सरकारच्या निर्णयांचा कहर जनतेवर होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यामुळे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करणार आहेत. महागाईमुक्त भारताच्या मागणीसाठी 2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान जिल्हा मुख्यालयात धरणे, निदर्शने, आंदोलने केली जाणार आहेत. 7 एप्रिल रोजी मुंबईतील राज्य मुख्यालयावर महागाईमुक्त भारताच्या मागणीसाठी धरणे, निदर्शने आणि आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT