Petrol diesel price hike  Dainik Gomantak
महाराष्ट्र

एकाच महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तब्बल 16 वेळा दरवाढ

देशातील पाच राज्यांच्या निवडणुका (Election) संपल्यानंतर लगेचच इंधन दरवाढीला वेग येत आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या कोरोना आणि डेल्टा प्लसच्या (Corona Delta Plus) वाढत्या रूग्णसंख्येमुळे कडक निर्बंध लागू केले आहेत. या दरम्यान गेल्या तीन महिन्यांपूर्वी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमती काही प्रमाणात स्थिरावल्या होत्या. पण आता हळूहळू इंधन दरवाढ होत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकत्याच देशातील पाच राज्यांच्या निवडणुका (Election) संपल्यानंतर लगेचच इंधन दरवाढीला वेग येत आहे. (After elections Petrol diesel price hike 16 times in one month)

मागच्या एका महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल 16 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलने शंभरीचा आकडा केव्हाच पार केला आहे. दरम्यान, आज राज्यात पेट्रोलच्या किमतीत 34 पैसे तर डिझेलच्या किमतीत 30 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर आज मुंबईतील पेट्रोलची किंमत 104.90 रुपये प्रति लिटर एवढी असून डिझेलची किंमत 96.72 रुपये प्रति लिटर झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात स्थिरावल्या होत्या, आणि काही प्रमाणात कमी देखील करण्यात आल्या होत्या.

मात्र निवडणुका संपल्यानंतर लगेचच संपूर्ण देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्याचं पाहायला मिळत आहे. जवळपास 56 दिवस निवडणुकांचे बिगुल वाजताच देशातील इंधन दरवाढ थांबविण्यात आली होती. दरम्यान यामुळे तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक बोजाही पडला होता. आता तीच आर्थिक तूट भरून काढण्याचा प्रयत्न तेल कंपन्या करत असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकार आता नेमका इंधन दरवाढीवर निर्णय घेणार का? किंवा येणाऱ्या काळात या किंमती कमी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Health Horoscope: 'या' आठवड्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता! 'या' राशींनी टाळावा ताण आणि चुकीचा आहार

British Fighter Jet: ब्रिटनच्या फायटर जेटचे जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग, दीड महिन्यातील दुसरी घटना; चीन-रशियाने उडवली खिल्ली

Ganesh Pooja: 'घाईत केलेली पूजाही ठरते पावन, पण...'; मनाप्रमाणे फळ मिळवण्यासाठी पुजाऱ्यांनी सांगितले रहस्य

Kalasa Banduri Project: कळसा-भंडुरावर मोठी अपडेट! कर्नाटकच्या राज्यपालांनी दिला 9.27 एकर जमीन ताब्यात घेण्याचा आदेश

Digital Arrest: सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट स्कॅम! गोमंतकीय नागरिकाला 1.05 कोटींचा गंडा; केरळमधून एकाला अटक

SCROLL FOR NEXT