Maharashtra Politics Eknath Shinde, Aaditya Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंचा वाढता हस्तक्षेप एकनाथ शिंदेंच्या नाराजीचे कारण? उद्धव सरकार अडचणीत येण्याची 5 कारणे

आदित्य ठाकरेला वर आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांना बाजूला केले जात असल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे सरकारमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीपासून शिवसेनेच्या संपर्कात नाहीत. शिवसेनेसाठी ही अडचणीची बाब आहे कारण ते एकटे नाही तर 29 आमदार बेपत्ता आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचवेळी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली असून त्यात पक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra Politics Eknath Shinde)

29 आमदार आणि मंत्र्यांसह एकनाथ शिंदे बेपत्ता झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदेसह 29 आमदार/मंत्र्यांनी एवढा मोठा निर्णय घेतल्याचे असे काय झाले हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न समोर येत आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की एकनाथ हे उद्धव सरकारवर बराच काळ नाराज होते, जेव्हा जेव्हा मीडियाने त्यांना त्यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ती केवळ खोटी माहिती किंवा अफवा असल्याचे म्हटले. त्याच वेळी, आता एकनाथ शिंदे 29 आमदार/मंत्र्यांसह बेपत्ता आहेत.

जाणून घेऊया एकनाथ शिंदे सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर का नाराज आहेत?

1- सरकार स्थापन करताना बहुतांश महत्त्वाची मंत्रीपदे राष्ट्रवादीकडे गेली.

2- शिवसेना नेत्यांना निधी मिळत नव्हता.

3- एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या मंत्रालयात आदित्य ठाकरेंचा हस्तक्षेप

4- आदित्यला वर आणण्यासाठी शिंदे यांना बाजूला केले जात असल्याचा आरोप आहे.

5- त्यांच्या विभागाचे सचिव आणि आयएएस अधिकाऱ्यांनी सीएमओच्या कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी न करण्यास सांगितले होते.

शिवसैनिक पदासाठी विकला जाणार नाही: संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय गोंधळादरम्यान भूकंप होणार नसल्याचे सांगितले. शिवसैनिक पदासाठी विकला जाणार नाही. भाजपने याआधीही प्रयत्न केले, मात्र यावेळीही ते यशस्वी होणार नाहीत, महाराष्ट्र सरकार अस्थिर होऊ देणार नाही. महाराष्ट्र सरकारचे काही होईल असे मला वाटत नाही. यासोबतच सर्व आमदार लवकरच परतणार असल्याचे राऊत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT