Strike In Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्यास होणार...

काम नाही, वेतन नाही हे धोरण राबवण्यात येणार असल्याचे देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. दरम्यान, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे सरकारकडून (Government of Maharashtra) सांगण्यात आले आहे. मात्र याचवेळी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक परिपत्रक काढण्यात आले. त्यात संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संपात सहभागी झाल्यास काम नाही, वेतन नाही हे धोरण राबवण्यात येणार असल्याचे देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (State Employee Strike In Maharashtra From Today Midnight)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी बैठक पार पडली. मात्र त्या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथिगृहावर पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे व सध्या ती बैठक सुरू आहे, या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव तसेच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थितआहेत. यात जर तोडगा निघाला तर संप मागे घेतला जाणार आहे, अन्यथा संप सुरू राहणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

संप कशासाठी

नोकरभरती, जुनी पेन्शन योजना (Pension) आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत. या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार आहेत. दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे नेमका यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT