Accident of SpiceJet flight in Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईहून निघालेल्या स्पाइसजेटच्या विमानाचा अपघात, 40 प्रवासी जखमी

दैनिक गोमन्तक

मुंबई : मुंबईहून पश्चिम बंगालमधील दुर्गापूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान रविवारी संध्याकाळी वादळात अडकले. त्यामुळे विमानातील सुमारे 40 प्रवासी जखमी झाले. यातील 12 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

(accident of SpiceJet flight in Mumbai)

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालक अरुण कुमार म्हणाले, "केबिन क्रूच्या सदस्याव्यतिरिक्त, सुमारे 40 प्रवासी या घटनेत जखमी झाले आहेत. यातील काहींच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना टाके पडले आहेत. एका प्रवाशाने पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याचीही तक्रार केली आहे.

केबिनचे सामान पडल्याने अनेक प्रवासी जखमी झाले

स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने 189-सीटर बोईंग 737-800 विमानात बसलेल्या घटनेची पुष्टी केली. लँडिंगदरम्यान विमान वादळात अडकल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी वादळात विमान अडकल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरल्याचे सूत्रांनी सांगितले. यादरम्यान केबिनमधील सामान अनेकांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

विमानात 188 प्रवासी होते

त्याचवेळी, विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले की, विमानात 188 प्रवासी होते. “काही प्रवाशांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

(Latest News)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT