Goa Accident Case Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोल्हापूर : कासारवाडी - सादळे घाटात अपघात; एक ठार 25 जखमी

ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टर अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन एक ठार 25 जखमी

दैनिक गोमन्तक

कोल्हापूर : येथील सादळे घाटात आज (रविवार) सायंकाळी मोठा अपघात झाला. त्यात एक ठार 25 जखमी झाल्याची माहिती समोर आहे. हा अपघात ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरचा झाला असून ज्योतिबाचे दर्शन घेऊन परत जाताना झाला. आज रविवार आणि ज्योतिबाचे खेटे सुरू असल्याने रस्त्याला वर्दळ होती. त्यांमुळे अपघात होताच नागरिकांनी तिकडे धाव घेत मदत कार्य सुरू केले. तसेच याची माहिती पोलिसांना दिली. तर तत्काळ ॲम्बुलन्स बोलवून जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Accident at Kasarwadi - Sadale Ghat near Kolhapur)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील कोरेगाव (ता. वाळवा) येथील यशवंत जाधव हे ज्योतिबाचे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या सोबत गावातील ऊसतोड कामगारांना हिंदुस्तान ट्रॅक्टरमधून आनले होते. यावेळी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कासारवाडी घाटात ट्रॅक्टर जाताना येथील महाविद्यालयाच्या (College) जवळाल मोठ्या वळणावर ट्रॅक्टरचा वेग वाढला. तर ट्रॅक्टरचे पाठीमागील मोठे चाक अक्षरशः निघून पडले. त्यामुळे ट्रॅक्टर व पुढील मजुरांनी भरलेली ट्रॉली कठड्यावरून सुमारे वीस ते पंचवीस फुटांवरून खाली पडली.

या अपघातात (Accident) ट्रॉलीतील नागरिक दगडांवर आदळल्याने जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाला असून दोघे अतीगंभीर तर बावीस जण जखमी झाले आहेत. जखमींना (Injured) शहरातील सीपीआर रुग्णालयात (Hospital) दाखल केले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओल्ड गोवा चर्च परिसरातील बेकायदेशीर बंगला पाडा; विरोधकांनी दणाणून सोडले सभागृह, 10 स्थगित करावे लागले कामकाज

Tamannaah Bhatia: "थुंकी लावा,पिंपल्स घालवा" तमन्ना भाटियाचा विचित्र सौंदर्य मंत्र; सोशल मीडियावर Video Viral

IND vs ENG: सिराज-प्रसिद्धचा कहर, इंग्लंडचा 6 धावांनी पराभव; भारताने कसोटीत पहिल्यांदाच केला 'हा' पराक्रम

Goa Assmbly Live: आनी मुख्यमंत्री म्हणटा भिवपाची गरज ना... - व्हेंन्झी व्हिएगस

Job Scam: "रेस्टॉरंटला रेटिंग द्या आणि कमवा 5 ते 8 हजार", MPच्या तरूणाने गोव्यात बसून केला स्कॅम! मुंबईच्या व्यक्तीकडून लुटले 6 लाख

SCROLL FOR NEXT