Aditya Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

मंदिर-मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर 15 जूनला आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

देशात सुरु असलेल्या मंदिर-मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे 15 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या मंदिर-मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे 15 जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर (Ayodhya Visit) जाणार आहेत. शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही अयोध्येला भेट दिली आहे. ही माहिती आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा दौरा कोणत्याही अजेंड्यावर होत नाहीये, कोणत्याही प्रकारचे राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जात नाहीये. (Aaditya Thackeray visit to Ayodhya on June 15 against the backdrop of temple mosque dispute)

याशिवाय काश्मीरमधील टार्गेट किलिंगच्या घटनांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, काश्मीर पुन्हा एकदा जळत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. काश्मीरचे हजारो पंडित आता पलायन करून आपल्याच देशात निर्वासित होत आहेत, हे सरकार काय करत आहे? ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि पलायनाबद्दलची चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र सरकार काश्मिरी पंडितांच्या पाठीशी आहे आणि त्यांना मदत देखील करेल, असे ते यावेळी म्हणाले.

दिल्लीतील दोन प्रमुख व्यक्ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत - संजय राऊत

संजय राऊत यांनी पुढे टोमणा मारला आहे की, दिल्लीतील दोन प्रमुख व्यक्ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहेत. कधी पृथ्वीराज चौहान तर कधी काश्मिरी फाईल्सचा प्रचार करताना दिसून येत आहेत. पुढे म्हणाले की, देशाच्या रक्षणासाठी यापूर्वी अनेक सुरक्षा जवान शहीद झाले आहेत त्यात मुस्लिम सुरक्षा जवानांचाही समावेश आहे.

काश्मिरी पंडितांना शक्य ती सर्व मदत केली जाईल: उद्धव ठाकरे

काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना लक्ष्य केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे () यांनीही याआधी दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि काश्मिरी पंडितांसाठी जे काही करता येईल ते करू असं त्यांनी यावेळी सांगितले. काश्मिरी पंडितांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंदूंच्या हत्यांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र आणि राज्यातील जनता काश्मिरी पंडित आणि तिथे राहणाऱ्या हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू. त्यांच्या म्हणण्यानुसार, काश्मीरमध्ये राहणार्‍या हिंदू आणि काश्मिरी पंडितांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत ते करतील.

काश्मीरमध्ये परिस्थितीची पुनरावृत्ती होतेयः उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू आणि काश्मिरी पंडितांच्या लक्ष्यित हत्येबद्दल संताप व्यक्त केला. काश्मीरमधील सध्याची परिस्थिती अतिशय नाजूक आणि चिंताजनक झाली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचीच पुनरावृत्ती होत आहे हे दुर्दैवी असल्याचे ते यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला आवाहन केले असून काश्मिरी पंडित आणि तेथे राहणार्‍या हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकार लवकरच अनेक कठोर पावले उचलेल अशी आशा व्यक्त कली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT