Crime Dainik Gomantak
महाराष्ट्र

Aurangabad: औरंगाबाद पुन्हा हादरलं! महिलेवर दोनवेळा बलात्कार करून गावात व्हिडिओ केला व्हायरल

शूट केलेला व्हिडिओ पतीच्या हातात पडला

Pramod Yadav

Aurangabad: एका वृद्ध महिलेला तीन जणांनी नग्न करत मारहाण करून, त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. गंगापूर तालुक्यातील ओझर गावात ही संतापजनक घटना घडली होती. दरम्यान, औरंगाबाद येथून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच आता गंगापूर तालुक्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर बलात्कार करून तोच व्हिडिओ गावात व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. महिला गाईला गवत आणण्यासाठी शेतात गेली असता आरोपींनी ती एकटी असल्याचं पाहून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच, मला तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवू दे असे म्हणू लागला. महिलेनं नकार देऊन, तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी भगवान सुकासे याने महिलेवर बळजबरीने बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे या घटनेचा त्यांनी व्हिडिओ देखील शूट केला.

घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगीतल्यास हा व्हिडिओ मी दुसऱ्यांना दाखवुन गावात बदनामी करेन अशी धमकी आरोपीने दिली. दरम्यान, पुन्हा एकदा आरोपी भगवान सुकासेने त्याचे साथिदार रामेश्वर अशोक सुकासे आणि अमरनाथ सुनिल सुकासे यांच्यासह महिलेवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. यावेळीही त्यांनी घटनेचा त्यांनी व्हिडिओ शूट करून गावात व्हायरल केला. पीडित महिलेला तिचा भाव गंगापूर पोलीस ठाण्यात घेऊन गेला व या ठिकाणी तीनही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: मोबाईलवर नको, मैदानावर खेळा

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

SCROLL FOR NEXT