Goa Liquor Seized At Ajra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूचे 35 बॉक्स आजऱ्यात जप्त; पुण्यातील कारचालकास अटक

गडहिंग्लज उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; कारसह एकूण 4.5 लाख रूपयांचा मुद्देमाल

Akshay Nirmale

Goa Made Liquor Seized At Kolhapur: गोवा बनावटीच्या दारूची कारमधून तस्करी करणाऱ्या एकास अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरातील आजरा येथे ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज विभागाने ही कारवाई केली.

गोव्यातून ही दारू कारमधून महाराष्ट्रात आणली होती. ती पुण्याकडे नेली जाणार होती, असा संशय आहे. कारचालक हा मूळचा पुण्याचा आहे. तसेच पुण्यातीलच कारचा यासाठी वापर केला गेला होता. संबंधित कारही जप्त करण्यात आली आहे. एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, लक्ष्मण पाटील, भरत सावंत, संदीप जानकर, संदीप चौगुले यांच्या पथकाने ही कारवाई केली. हे पथक व्हिक्टोरिया पूल परिसरात गस्त घालत होते.

तेव्हा त्यांना गडहिंग्लज-आजरा मार्गावरील व्हिक्टोरिया पुलाजवळ एक संशयास्पद कार दिसली. या कारची झडती घेतल्यावर या कारमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे एकूण 35 बॉक्स आढळून आले. कार (MH 12 DY 4593) आणि दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. कारसह दारूच्या बाटल्यांची एकूण किंमत 4 लाख 48 हजार 520 रूपये इतकी होते.

या प्रकरणी कारचालक शिवाजी अनंता धायगुडे (वय 55) याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा फातिमानगर, पुणे येथील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Teacher Transfer Protest: बदली रद्द करा! शिक्षिकेच्या तडकाफडकी बदलीविरोधात गावडोंगरी शाळेतील विद्यार्थी पटांगणात ठाण मांडून; पालक आक्रमक

Goa Casino Crackdown: कोट्यवधींचा महसूल थकवणाऱ्या दोन बड्या कॅसिनोंना सरकारचा दणका! परवाने केले तत्काळ रद्द; वारंवार नोटीस देऊनही मालकांचं उत्तर नाही

Romeo Lane Illegal Shack: हडफडे घटनेनंतर सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये! दोन कॅसिनोंचे परवाने रद्द, तर रोमिओ लेनच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

Horoscope: तुमच्या इच्छा पूर्ण होतील! 'या' राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या संपूर्ण भविष्य!

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

SCROLL FOR NEXT