Bison In Sawantwadi Dainik Gomantak
महाराष्ट्र

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

Bison: सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे तब्बल १५ गवारेड्यांचा कळप आढळून आला आहे. जंगलातून बाहेर आलेल्या या गवारेड्यांच्या कळपामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे तब्बल १५ गवारेड्यांचा कळप आढळून आला आहे. जंगलातून बाहेर आलेल्या या गवारेड्यांच्या कळपामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या कळपाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र एवढ्या संख्येने गवे एका ठिकाणी दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

कोलगाव परिसरात एका वेळेस एवढ्या मोठ्या संख्येने गवे बाहेर आल्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. गावालगत असलेल्या शेतात हा कळप उतरला होता. काही वेळ तेथेच थांबून पुन्हा जंगलाच्या दिशेने ते निघून गेले.

या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली असून वनविभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. गवे आक्रमक स्वभावाचे असल्याने गर्दी करणे धोकादायक असते, असा इशाराही वनविभागाने दिला आहे. दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

बांगायतदारांनाही या गवारेड्यांच्या कळपामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतशिवारात उतरलेल्या गवांनी उसाचे आणि इतर पिकांचे नुकसान करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच पावसाळ्यामुळे शेतीच्या कामात अडथळे येत असताना गवांच्या या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT