Goa Made Liquor Sealed  Dainik Gomantak
महाराष्ट्र

गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात येणार, कोल्हापूर पोलिसांना टीप मिळाली, अन् कागल-निढोरी मार्गावर सापळा लावला

गोवा बनावटीची दारू या मार्गावरून महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा लावला.

Pramod Yadav

गोव्यातून महाराष्ट्रात तस्करी होणाऱ्या दारूकडे पोलिसांची नेहमीच करडी नजर असते. यासाठी गोवा आणि महाराष्ट्राच्या मिळणाऱ्या सीमांवर पोलिस तैनात असतात. गोव्यातून एकही दारूची बाटली महाराष्ट्रात घेऊन जाण्यास बंदी आहे. तरीही तस्करीचे धाडस करणारे काही महाभाग असतात.

अशीच एक घटना कागल-निढोरी येथून समोर आली आहे. गोवा बनावटीची दारू या मार्गावरून महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा लावला.

गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात येणार असल्याची खात्रिशीर माहिती राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाका कागल व हातकणंगले निरीक्षक यांना 16 फेब्रुवारी रोजी मिळाली. कागल-निढोरी रोडवरून MH 09 FL 6028 हे वाहन येणार असल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान, पोलिसांनी या परिसरात सापळा लावला.

दुपारी तीन वाजता संबधित संशयित वाहन याठिकाणी आले. पोलिसांनी वाहन थांबवून त्याची चौकशी केली. वाहनात सोलरचे स्पेअर पार्ट असल्याचे सांगण्यात आले. त्याचे बिल देखील चालकाने दाखवले. पण माहिती खात्रिशीर असल्याने पोलिसांनी वाहनाचे शटर सिल कट केले.

वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेली गोवा बनावटची दारू आढळून आले. पोलिसांना 14,20,800 रूपये किमतीची दारू जप्त केली. तसेच, वाहन असा एकूण 22,23,800 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी नेताजी एकनाथ भोसले (वय 26, जत, सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

किती मद्दसाठा जप्त केला?

अॅड्रीयल क्लासिक व्हिस्कीचे 750 मिलीचे एकूण 200 बॉक्स, इम्पेरियल ब्ल्यु व्हिस्कीचे 180 मिलीचे एकूण 10 बॉक्स असे 14,20,800 रूपये किमतीची 210 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

Shreyas Iyer: दुखापतीमुळे चिंता वाढली: श्रेयस अय्यरला ICU मध्ये हलवलं; कुटुंबाला सिडनीला नेण्याची तयारी सुरू

Pakistan Afghan Tension: पाकिस्तानात मोठी चकमक! 4 आत्मघाती हल्लेखोरांसह 25 दहशतवादी ठार, पाक-अफगाण सीमेवर पुन्हा तणाव; स्फोटकांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT