Indian Railways Dainik Gomantak
महाराष्ट्र

साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या 10 विशेष गाड्यांना मुदतवाढ

शिर्डीला जाणाऱ्या 10 विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

दैनिक गोमन्तक

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी आणि ढेहर का बालाजीदरम्यान धावणाऱ्या 10 साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामध्ये प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे. (10 special trains going to Shirdi have been extended)

रेल्वे क्रमांक 09740 साप्ताहिक अतिजलद उन्हाळी विशेष साईनगर शिर्डी येथून 3 जुलै ते 31 जुलैपर्यंत (5 फेऱ्या) दर रविवारी सकाळी 7.25 वाजता सुटणार आहे आणि ढेहर का बालाजी येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8.10 वाजता पोहोचणार आहे.

रेल्वे क्रमांक 09739 साप्ताहिक अतिजलद उन्हाळी विशेष ढेहर का बालाजी येथून 1 जुलै ते 29 जुलैपर्यंत (5 फेऱ्या) दर शुक्रवारी रात्री 9.20 वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8.30 वाजता पोहोचणार आहे. या दोन्ही गाड्यांच्या थांब्यात आणि संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तसेच विशेष ट्रेन क्रमांक 09740 साठी विशेष शुल्कासह बुकिंग आजपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa politics: "जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती पसरवली!" फेरफार केलेल्या व्हिडिओ प्रकरणावरून, अजय खोलकर यांचा थेट आरोप

Chimbel: चिंबल पठारावरील 'ती' जागा पूर्ववत करा; ग्रामस्थांकडून सरकारला 7 दिवसांची मुदत, पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची ठिणगी आता गोव्यात; पाठिंबा वाढल्याने केंद्र सरकारवरील राजकीय दबाव अधिक तीव्र

Goa ITMS: 24 तासांत तब्बल 23.255 वाहतूक नियमांचे उल्लंघन! राज्यात 26 ठिकाणी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' प्रणाली कार्यान्वित

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

SCROLL FOR NEXT