Narayan Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

Narayan Rane Bungalow: नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका; अधिश बंगल्याचं अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश

हायकोर्टने नारायण राणे यांना 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) हायकोर्टने 10 लाखाचा दंड ठोठावला आहे. अधीश बंगल्या प्रकरणी हा आदेश देण्यात आला आहे. सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नारायण राणे यांचा जुहूमध्ये बंगला आहे. तो बंगला सीआरझेडचे उल्लंघन करून बांधल्याचा ठपका लावण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. सीआरझेड कायदा आणि एफएसआयचे उल्लंघन केल्याचे हायकोर्टाला दिसून आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अवैध बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेला दिली होती. आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोपही दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्याची नोटीस बजावली होती.

मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार मुंबई महानगरपालिकेकडून राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने बांधकाम तोडण्याची नोटीस बजावली होती.त्यावरून राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. राणे यांच्यावरील कारवाई ही महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने केल्याचा आरोप राणे आणि भाजपने केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT