breaking marathi news Dainik Gomantak
Live Updates

Goa Live News: सिद्धी किनाळेकर चालवते वडिलांची गणपतीची चित्रशाळा

Today's Goa Marathi Latest News: गोव्यातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये जाणून घ्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

सिद्धी किनाळेकर चालवते वडिलांची गणपतीची चित्रशाळा

गडेकर भाटले पेडणे येथील सिद्धी किनाळेकर ही महिला आपल्या वडिलांची गणपतीची चित्रशाळा जिद्दीने चालवते,सरकारकडून अनुदान न घेता ती केवळ चिकण मातीच्याच मुर्त्या करतात.

मायणा-कुडतरी पोलिसांचा बेकायदेशीरपणे चालणाऱ्या मदरशावर छापा; १७ अल्पवयीन मुलांना वाचवले

मायणा-कुडतरी पोलिसांनी गृहनिर्माण मंडळ परिसरातील अंजुमन हायस्कूलच्या मागे असलेल्या बेकायदेशीरपणे चालणाऱ्या मदरशावर छापा टाकला. १७ अल्पवयीन मुलांना वाचवण्यात आले. अल्पवयीन मुले गोवा, बिहार आणि कर्नाटकातील असल्याची माहिती आहे.

आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याविरुद्ध समाज माध्यमावर अवमानकारक पोस्ट

आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याविरुद्ध समाज माध्यमावर अवमानकारक पोस्ट. पिळगाव येथील नरेश सालेलकर याला अटक. डिचोली पोलिसांची कारवाई

गोवा-लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार!

गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी थेट सुरू असलेली विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर ही सेवा तात्पुरती थांबवण्यात आली होती, मात्र आता ती यंदाच्या हिवाळी हंगामात पुन्हा सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे.

खंडणी प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी ४ जणांना केली अटक

फातोर्डा पोलिसांनी वॉल्टर फर्नांडिस, रोहित फळदेसाई, तिरुपक्ती वरकुरी आणि अन्य एकाला खंडणी प्रकरणात अटक केली. वॉल्टर फर्नांडिसच्या ताब्यातून बंदूकही जप्त करण्यात आली असून तपास चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Gas Cylinder Refilling: गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड, साळगावात 164 सिलिंडर जप्त; पाचजण ताब्यात

Melvin Noronha: गोमंतकीय डिझायनरचे यश! मरियन-लक्ष्मीचा आशीर्वाद; टॅन्सी रेणू पालने जिंकले 'राष्ट्रीय वेशभूषे'चे पारितोषिक

Mapusa Electric Shock: 'आमच्या जीवासोबत खेळ!' म्हापसा मार्केटमध्ये एकाला विजेचा धक्का; दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण

Horoscope: शुक्र करणार कर्क राशीत प्रवेश! 'या' 4 राशींना जाणवणार मोठा बदल

Asia Cup: आशिया कप संघाच्या घोषणेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का; हा स्टार फलंदाज जखमी

SCROLL FOR NEXT