Illegal Gas Cylinder Refilling
Illegal Gas Cylinder RefillingDainik Gomantak

Illegal Gas Cylinder Refilling: गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड, साळगावात 164 सिलिंडर जप्त; पाचजण ताब्यात

Goa Illegal Gas Cylinder: साळगावात एकूण १६४ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Published on

साळगाव : गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करून दुसऱ्यांना पुरवठा करणाऱ्या साळगाव येथील अवैध केंद्रावर नागरी पुरवठा विभाग, वजन-माप विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईदरम्यान एकूण १६४ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राधेश्याम राजस्थान (२४), विकास स्वरूप राम (२२), रमेश कुमार (३८), प्रदीप कुमार (३५) आणि राम स्वरूप (२७). या पाचही जणांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे.

Illegal Gas Cylinder Refilling
Goa: स्‍वदेशी वस्‍तूंना प्राधान्‍य द्या, देश बळकटीत सहभागी व्‍हा! पर्यटनमंत्री खंवटेंचे आवाहन

ही कारवाई नागरी पुरवठा विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती दीपा फुलरारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्यासोबत नागरी पुरवठा आणि कायदेशीर मापनशास्त्र विभागातील निरीक्षक व सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते. अंमलबजावणीची प्रभावीता सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनीही मोठी मदत केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले अनेक गॅस सिलिंडर हे बनावट असल्याचे आढळून आले.

Illegal Gas Cylinder Refilling
Goa Crime: ..बऱ्या बोलाने 2 कोटी रुपये द्या! 'वॉल्टर' नावाचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; संशयितांविरुद्ध तक्रार दाखल

या घटनेनंतर नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी नागरिकांना आवाहन केले की, गॅस सिलिंडर घेताना तो नक्की वजन करूनच घ्यावा, जेणेकरून अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसेल.

या कारवाईमुळे अवैध गॅस व्यापाराला मोठा धक्का बसला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com