Goa live news in Marathi Dainik Gomantak
Live Updates

Goa Live News: तांबडी सुर्ला येथे तरुणाईचा 'सूर्यनमस्कार'ने नूतन वर्षारंभ

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी, राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि नवीन वर्षाच्या बातम्या

गोमंतक ऑनलाईन टीम

तांबडी सुर्ला येथे तरुणाईचा 'सूर्यनमस्कार'ने नूतन वर्षारंभ

नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यासाठी सकारात्मक संदेश देऊन करण्यासाठी, बुधवारी पहाटे तांबडी सुर्ला येथील ऐतिहासिक महादेव मंदिरात एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संकेत आरसेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि बजरंग दलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शेकडो तरुण सहभागी झाले होते.

पहाटे ६:०० वाजल्यापासून युवकांनी सूर्यनमस्कार, योगासने, ध्यान आणि धावण्याचा सराव केला. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांपेक्षा शिस्त आणि शारीरिक स्वास्थ्याला महत्त्व देण्याचा संदेश यातून देण्यात आला. तरुण पिढीमध्ये सुदृढ जीवनशैली आणि सकारात्मक सवयी रुजवण्यासाठी या 'हेल्दी' नूतन वर्षारंभाचे आयोजन केल्याचे संयोजकांनी सांगितले.

कोकण रेल्वे पोलिसांची 2025 मधील कामगिरी; 32 लाखांचा चोरीचा माल जप्त

कोकण रेल्वे पोलिसांनी (KRPS) वर्ष २०२५ मधील आपल्या कामगिरीचा अहवाल सादर केला आहे. वर्षभरात चोरीच्या एकूण ३० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी कौशल्याने तपास करत ३२,६३,४५० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कळंगुटमध्ये हाणामारीत वृद्धाचा मृत्यू; संशयित पोलिसांच्या ताब्यात

कळंगुटमधील परोबोवाडो परिसरात आज पहाटे झालेल्या एका हल्ल्यात पश्चिम बंगालमधील एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती एका बंगल्यात केअरटेकर (रक्षक) म्हणून काम करत होती. किरकोळ वादातून ही हाणामारी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी वेगाने हालचाली करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकशाहीत प्रत्येक लोकप्रतिनिधीला समान अधिकार: दामू नाईक

"सरकार आणि पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादा लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला बाजूला सारता येत नाही," असे रोखठोक मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केले आहे. लोकशाहीत प्रत्येक निवडून आलेल्या नेत्याला समान अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून देताना ते म्हणाले की, "निवडणुकीवेळी आम्ही आणि मगोप (MGP) एकमेकांचे 'दुश्मन' होतो, मात्र निवडणुकीनंतर ते आमचे युतीचे भागीदार बनले आणि त्यांना मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले." राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचे संकेत त्यांनी या विधानातून दिले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमंतकीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा

"नूतन वर्षाच्या सुरुवातीला आपण भूतकाळातील धडे सोबत घेऊया आणि सकारात्मक भावनेने एका नव्या सुरुवातीकडे वाटचाल करूया," अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्ष २०२६ च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

6 वर्षांच्या रमाने 50 सेकंदात पूर्ण केले 8 श्लोक; गोव्याची चिमुकली बनली 'ग्रँडमास्टर'! 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव

Vijay Hazare Trophy: मुंबईचा विजयी चौकार; गोवा संघाचा 87 धावांनी पराभव, अभिनव तेजराणाची शतकी खेळी व्यर्थ

'कुशावती' सुशासनाची तहान भागवेल? - संपादकीय

Goa GI Tag: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 5 नवीन उत्पादनांना मिळाले 'GI' मानांक; कृषी समृद्धीचा जागतिक गौरव

Pillion Helmet Rule: आता मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, रस्ते सुरक्षेसाठी मोठा निर्णय! टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT