गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावर आणि बांधकाम परवानग्यांच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुर्का-बांबोळी (Curca-Bambolim) पंचायत क्षेत्रात एका सीमा भिंतीच्या कथित बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी उच्च न्यायालयाने पंचायतीला नोटीस बजावली.
दक्षिण गोव्यातील बेतुल येथील 'एटीआय ओएनजीसी' (ATI ONGC) संकुलात आज दुपारच्या सुमारास आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. वेल्डिंगचे काम सुरू असताना उडालेल्या ठिणगीमुळे ही आग लागली असून, यामध्ये एका वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
बर्च बाय रोमिओ लेनचे सहमालक अजय गुप्ता यांनी जामिनासाठी म्हापसा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. गुप्ता यांच्या जामीन अर्जावर आज (१८ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. बर्चला ०६ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता.
कुख्यात गुंड अन्वर शेख उर्फ टायगर शेख याच्या हत्या प्रकरणातील सर्व संशयितांची जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. पुराव्यांअभावी न्यायालयाने नागराज नायकर, जगेश मेटी, सदाशिव मेटी, बसुराज कड्डी आणि मंजुनाथ मेटी यांची सुटका केली आहे. २०१९ साली मोती डोंगर येथे अन्वर शेख याचा खून झाला होता.
नावेलीतील शांतीनगर रावणफोंड परिसरात जलवाहिनी फुटली आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी टाकलेल्या दगडांमुळे जलवाहिनी फुटल्याचे सांगितले जात आहे.
जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले आहे. वयाच्या १०० व्या वर्षी सुतार यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र सरकारने अलिकडेच त्यांना महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला होता. यापूर्वी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि टगोर पुरस्कारही देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.