सालेली सत्तरी येथील राजाराम गावकर यांना आमदार डॉ देविया राणे करणार मदत, जोरदार पावसामुळे बुधवारी (29 ऑक्टोबर) सकाळी त्यांचा घराचे छत पडून मोठे नुकसान झाले आहे.
आम आदमी पार्टीचे (AAP) गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र टीका केली. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत जबाबदार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. पालेकर म्हणाले की, "गोवा पोलीस आता बाउन्सर आणि गुंडांसारखे वागत आहेत. विशेषतः काही नव्याने नियुक्त झालेले पीएसआय (PSI) खंडणीखोर (Extortionists) आणि गुंड बनले आहेत."
गोव्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करुन राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 40 हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा नेमका अंदाज घेण्यासाठी कृषी विभागाकडून लवकरच पाहणी (Survey) केली जाईल.
गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनोत्तर पावसाचा कहर सुरुच आहे. दुपारी बारा वाजता डिचोली बाजारात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांची धावपळ झाली. हवामान खात्याने राज्यात आज यलो अलर्ट जारी केला असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हरमल समुद्रकिनारी वस्तूंची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या जार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिनाक्षी लामाणी, सरोज लमाणी, चंद्रावा लमाणी, उमा कारभारी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सर्वजण समुद्रकिनारी विविध वस्तूंची विनापरवानगी, बेकायदेशीरपणे विक्री करत होते.
हवामान खात्याने गोव्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसासह वादळी वारे आणि वीजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भाड्याने घेतलेली कार परत न करता राजस्थानी पर्यटक फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कार आणि संशयित आरोपीचा शोध सुरु केला आहे. पर्यटकाने ओर्डा, कांदोळी येथून कार भाड्याने घेतली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.