Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

Dawood Ibrahim Danish Chikna Arrested: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय कुख्यात संशयित दानिश मर्चंट उर्फ दानिश ‘चिकना’ अखेर गोव्यात ‘एनसीबी’च्या जाळ्यात अडकला आहे.
Danish Chikna Arrested
Danish Chikna ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आणि अमली पदार्थांच्या व्यापारातील कुख्यात संशयित दानिश मर्चंट उर्फ दानिश ‘चिकना’ अखेर गोव्यात ‘एनसीबी’च्या जाळ्यात अडकला आहे.

देशभर चाललेल्या व्यापक शोध मोहिमेनंतर अमली पदार्थविरोधी विभागाच्या (एनसीबी) मुंबई युनिटने हणजूण येथील एका आलिशान रिसॉर्टवर बुधवारी मध्यरात्री धडक कारवाई करत दानिश आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत नोंद असलेल्या मोठ्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणाशी संबंधित तपासादरम्यान दानिशचा शोध सुरू होता.

Danish Chikna Arrested
Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

त्याचा देशातील विविध राज्यांमध्ये माग काढल्यानंतर शेवटी तो गोव्यात एका रिसॉर्टमध्ये लपल्याची खात्री मिळताच ‘एनसीबी’ने गुप्त पथक तयार करून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान दानिशने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ‘एनसीबी’च्या टीमने काही मिनिटांतच त्याला जेरबंद केले. दानिश मर्चंट हा दाऊद इब्राहिमच्या टोळीतील आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या ताब्यातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल फोन आणि काही संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आला असून, या सर्वांचा तपास सुरू आहे.

दीर्घकाळ तपासाचे फलीत

‘एनसीबी’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, दीर्घकाळाच्या तपासानंतर आरोपी पती-पत्नीचा मागोवा घेण्यात आम्हाला यश आले. हणजुणेतील एका रिसॉर्टमधून दोघांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

दानिश हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील महत्त्वाचा सहकारी मानला जातो. मुंबईत आणि विदेशात पसरलेल्या दाऊदच्या ड्रग्स नेटवर्कसाठी तो आर्थिक आणि लॉजिस्टिक व्यवस्था सांभाळत आहे.

बॉलिवूड आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित काही व्यवहारांमध्ये दानिशचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचेही उघड झाले होते. त्याचा अनेक वर्षांपासून दुबई आणि दक्षिण आशियाई देशांशी संपर्क आहे.

पुणे येथे गायकवाड नावाच्या व्यक्तीला ‘एनसीबी’ ने अटक केली होती. त्याच्याकडून ५०२ ग्रॅम मेफेड्रोने जप्त केले होते. तपासादरम्यान त्याने मुंबईतील गोडाऊनची माहिती दिली. त्यानंतर त्या ठिकाणी झोएब शेख याच्या ताब्यातून ८३९ ग्रॅम मेफेड्रोने जप्त करण्यात आले. हे ठिकाण दानिशची पत्नी हेना शाहच्या नावावर असल्याचे पुढे आले. त्यामुळे तिच्यावर पाळत ठेवण्यात आली.

Danish Chikna Arrested
Goa Sand Mafia Raj: गोव्यातील गोळीबाराची देशात चर्चा; 'एक्स'वर वाळू माफिया राज हॅशटॅग ट्रेन्डिंग

दानिश व ती गेले काही महिने आपले ठिकाण, मोबाईल क्रमांक आणि वाहने सातत्याने बदलत असल्याचे निष्पन्न झाले होते. तरीही हे दांपत्य मुंबईतील आपल्या हस्तकांच्या संपर्कात असतील हे गृहित धरून लक्ष ठेवण्यात आले. त्यावरून गेले काही दिवस ते दांपत्य गोव्यात असल्याचे समोर आले. तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तर गोव्यातून हे दूरध्वनी केले जातात हे निष्पन्न झाल्यावर त्यांना तातडीने गोव्यातून ताब्यात घेतले.

२०१९ साली ‘एनसीबी’ने मुंबईतील डोंगरी परिसरात एका भाजीपाल्याच्या दुकानामागे सुरू असलेली ड्रग फॅक्टरी उघडकीस आणली, ज्यातून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात दानिशला राजस्थानमधून अटक झाली होती.

२०२१ मध्ये कोटा पोलिस आणि ‘एनसीबी’च्या संयुक्त कारवाईत पुन्हा एकदा त्याला राजस्थानमध्ये पकडण्यात आले. त्यावेळी त्याच्या वाहनातून २०० ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते. त्याच्या संपर्कातील अन्य साथीदारांबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

तडीपार म्हणून घोषित

‘एनसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, दानिश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात एनसीबी व राजस्थान पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये तीन गुन्हे नोंदवले आहेत. याशिवाय मुंबई पोलिस ठाण्यांमध्ये सात अन्य गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी त्याला ‘तडीपार’ घोषित केले असून, त्याला मुंबईच्या महापालिका हद्दीत प्रवेशबंदीचा आदेश देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com