Kulan Sarvan Dainik Gomantak
गोवा

Kulna-Savorn Death Incident: महाराष्ट्रातील 25 वर्षीय तरुणाचा गोव्यात विजेच्या धक्क्याने मृत्यू; कुळण-सवर्ण येथील घटना !

गोमन्तक डिजिटल टीम

Death Due To Electric Shock:

कुळण-सवर्ण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुळण-सवर्ण येथील योगेश्वरी मंदिराच्या सभा मंडप परिसरात शॉक लागून 25 वर्षीय वैभव भिडे या तरुणाचा मृत्यू झाला. वैभव हा महाराष्ट्रातील झोळंबे-दोडामार्ग येथील रहिवासी आहे. गुरुवारी (17 ऑक्टोबर) रात्री साडेसात वाजण्याच्या ही धक्कादायक घटना सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी वैभव दुरुस्तीचे काम करत असताना विद्युत वाहिनीची स्पर्श होऊन पडला. त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी वैभवला तात्काळ डिचोली येथील आरोग्य केंद्रात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त योगेश्वरी मंदिरात पालखी उत्सव चालू होता. वैभव हा योगेश्वरी मंदिरात कार्यालयीन काम करत होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे देवस्थान समिती तसेच भाविकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

बेत्तीत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी, बेती येथे घराच्या अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय मुलीच्या अंगावर कॉन्क्रीट खांब पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली होती. तर व्हॉलिबॉल खेळताना एका 18 वर्षांच्या मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यूची घटना पालये-पेडणे येथे घडली होती. काही तरुण व्हॉलिबॉल खेळत होते. खेळताना त्यापैकी एका तरुणाचा लगतच्या विजेच्या खांबाला स्पर्श झाला होता. स्पर्श झाल्यावर लगेच तो धक्का बसून जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT