Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji locals demand pond beautification: पणजीशहराला लाभलेल्या दोन तळ्यांपैकी मळ्यातील तळ्याभोवती १५-२० वर्षांपूर्वी संरक्षक कठडे उभारल्यानंतर तळ्याचे रुपडे पालटेल असे वाटत होते, परंतु त्या तळ्याचे काही रुपडे पालटलेच नाही.
Panaji Lakes
Panaji Lakes Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Lake Beautification

पणजी: पणजी शहराला लाभलेल्या दोन तळ्यांपैकी मळ्यातील तळ्याभोवती १५-२० वर्षांपूर्वी संरक्षक कठडे उभारल्यानंतर तळ्याचे रुपडे पालटेल असे वाटत होते, परंतु त्या तळ्याचे काही रुपडे पालटलेच नाही. उलट तळ्याचा वापर आता मळा परिसरातून वाहून येणारे पावसाचे पाणी साठवण्याचे आणि तेथून ते उपसा करून खाडीत सोडण्यासाठी होऊ लागला आहे. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या तळ्यातील गाळ काढून सुशोभिकरण होणार तरी कधी? असा सवाल केला जात आहे.

पावसाचे पाणी उपसा करण्यासाठी जलस्रोत खात्याने पंपिंग स्टेशन उभारले आहे. या तळ्यातील गाळ काढला तेव्हा तळ्याला नवे रूप मिळेल, असे वाटत होते. परंतु तसे काही झाले नाही. मळ्यातील डोंगर-उतारावरून पावसाचे वाहून येणारे पाणी थेट तळ्यात येत असल्याने ते त्याठिकाणी साचले जाते. पावसाळ्यात मळा परिसरात पूरसदृष्य स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पाणी उपसा केंद्र उभारण्याचा निर्णय झाला आणि तळ्याच्या किनाऱ्यावर पंपिंग हाऊसची निर्मिती झाली.

मारुतीगडाच्या पायथ्याला असणाऱ्या या तळ्यात दिवसा मारुतीगडाची प्रतिमा विलोभनीय दिसते. मारुतीगडावर यात्रेच्यावेळी होणारी विद्युत रोषणाईचे प्रतिबिंबही लोभनीय असते. तळ्याच्या एका बाजूला मागील दहा-बारा वर्षांपासून पत्र्याचे संरक्षण उभे करण्यात आले आहे. अनेकदा या तळ्याच्या सुशोभिकरणाचा विषय महापालिकेच्या बैठकीत येऊन गेला, पण त्याकडे काही गांभीर्याने कोणी पाहिले नाही. पर्यटनाच्या दृष्टीने या तळ्यामध्ये बोटिंग सुरू केल्यास या ठिकाणच्या युवकांना व्यवसाय निर्माण होईल, पण तशी दूरदृष्टी असणारे नेतृत्वही लागते.

Panaji Lakes
Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

पंप स्टेशनचे लोकार्पण

मळ्यातील फोन्तेन्हास परिसरातील मलनिस्सारण विभागाच्यावतीने अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनचे लोकार्पण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यानिमित्ताने या भागातील या तळ्याच्या सौंदर्यीकरणाचा विषयही चर्चेत येईल,अशी स्थानिक रहिवाशांची इच्छा होती. मात्र, महापालिका आणि प्रशासनाने अजूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com