Coastal security exercise Sagar Kavach conducted by State and Central security Guards
पणजी: देशाची सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि सुरक्षा वाढविण्याचा उद्देश समोर ठेवून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय तटरक्षक दलातर्फे १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘सागर कवच’ सागरी सुरक्षा सराव करण्यात आला. भारतीय नौदल, कस्टम, किनारी पोलिस, सीआयएसएफ, एमपीए, मत्स्य विभाग आणि कॅप्टन ऑफ पोर्ट्स, गोवा यांच्या समन्वयाने हा सराव करण्यात आला.
घुसखोरी, तस्करी आणि नैसर्गिक आपत्तींसारख्या सागरी सुरक्षा धोक्यांना सामूहिक सहकार्य कसे करता येईल याचा सर्वे करण्यात आला आणि त्यात आवश्यक सुधारणा अधोरेखित करण्यात आल्या.
सराव वास्तववादी परिस्थितींचे अनुकरण असल्याने आवश्यक सुधारणा लक्षात आल्या. सरावा दरम्यान नक्कली दहशतवादी, धमक्यांसह विविध परिस्थिती निर्माण करून सर्व सहभागी एजन्सींमधील समन्वय वाढवणे हे याचे उद्दिष्ट होते. यामध्ये अंतर ओळखणे, घुसखोरांना रोखणे आणि संभाव्य लँडिंग किंवा महत्त्वाच्या भागांवर आणि जहाजांवर होणारे हल्ले रोखणे अशा घटनांचा समावेश होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.