Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Live Updates

विद्यार्थी मारहाण प्रकरण! पोलिसांवर आरोप करणाऱ्या मंत्री निळकंठ हळर्णकरांचा U-Turn; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today Breaking News Live Update: गोव्यात दिवसभर विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक बातम्या.

गोमन्तक डिजिटल टीम

कचरा कामगाराचा सांकवाळ पंच सदस्य आणि दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुलसीदास नाईक यांच्यावर हल्ला

एका कचरा कामगाराचा सांकवाळ पंच सदस्य आणि दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुलसीदास नाईक यांच्यावर हल्ला. गोवा सरकार कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचा गोवा फॅारवर्डचा आरोप.

HILL CUTTING मान्यता, मुख्यमंत्री डॉ. सावंतांनी मंत्री राणेंचा चेंडू टोलवला!

जमीन रुपांतरण, बांधकाम परवाना असे कायदेशीर सोपस्कार पूर्ण केलेल्या प्रकल्पांनाच मिळते मान्यता. मान्यता मिळालेल्या प्रकल्पांसाठी डोंगर कापणीसाठी म्हणून वेगळा परवाना देण्यात येत नाही.

जर काही RISKY असेल तरच उपजिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. आयपीबीव्दारे डोंगर कापणीला मान्यता मिळते या बाबीवर बोलताना मुख्यमंत्र्यांकडून प्रतिपादन.

विद्यार्थी मारहाण प्रकरण! पोलिसांवर आरोप करणाऱ्या मंत्री निळकंठ हळर्णकरांचा U-Turn

कामुर्लीतील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणात पोलिसांवर गलथान कारभाराचे आरोप करुन पोलिस निरिक्षक (PI) आणि तपास अधिकाऱ्याला (IO) निलंबीत करण्याची गुरुवारी सकाळी मंत्री निळकंठ हळर्णकरांनी केलेली मागणी संध्याकाळी बदलली.

वरिष्ठ पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितल्याने पोलिसांच्या निलंबनाची गरज नसल्याचे मंत्री हळर्णकरांचे प्रतिपादन.

Social activist च्या प्रभावाखाली पालकांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणे चुकीचे

Social activist च्या प्रभावाखाली पालकांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणे चुकीचे आहे. यामुळे चुकीचा संदेश जातो आणि विद्यार्थ्यांवर चुकीचा प्रभाव पडतो. कुंभरजुवा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेला पूर्ण चौकशीअंती परत सेवेत घेण्याचा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

दोन मिलीयन खजिन डंपाचा होणार ई-लिलाव!

सुमारे 2 मिलीयन खनिज डंपाचा होणार ई-लिलाव. हा तिसावा ई-लिलाव. नवे खाण पट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्याची माहिती

वीज खांब कोसळला, सोनाळ सत्तरीत वीज खंडीत

सोनाळ सत्तरीत वीज खांब कोसळला. वीज खांब कोसळल्याने गावात बत्ती गूल. लवकरात लवकर वीज सुरळीत करण्याची स्थानिकांची मागणी.

बांदोडा महालक्ष्मी मंदीराजवळ मुख्य रस्त्यावर ॲक्टीव्हा गाडी जळून खाक

बांदोडा महालक्ष्मी मंदीराजवळ मुख्य रस्त्यावर ॲक्टीव्हा गाडी जळुन खाक. मेकानिक ट्रायल साठी घेऊन जात होता ॲक्टीव्हा . हजारोंचे नुकसान

कदंबाच्या ड्रायव्हर, कंडक्टरना महामंडळाकडून चतुर्थीची मोठी भेट!

२०१८ साली रोजंदारी तत्वावर भरती केलेल्या कदंब महामंडळाच्या १५ ड्रायव्हर आणि १५ कंडक्टरना मिळाली कायम स्वरुपी नोकरी. अध्यक्ष उल्हास तुयेकर आणि उपाध्यक्ष क्रितेश गावकरांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान.उरलेल्यांनाही लवकरच कायम स्वरुपी नोकरी पत्रे देणार.तुयेकरांची माहिती.

आमदार फळदेसाईंनी मुख्याध्यापीकेची बदली करुन सुड उगवला?

एका सामाजिक कार्यकर्त्याकडून शाळेला प्रदान करण्यात आलेली LED TV स्विकारल्याने कुंभारजुवा प्राथमीक शाळेच्या मुख्याध्यापिकेची आमदार राजेश फळदेसाईंनी बदली केल्याचा पालकांचा आरोप. पालकांचे विद्यार्थ्यांसह पणजी आझाद मैदानावर धरणे. बदलीचा आदेश रद्द करण्याची मागणी.

अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने पिटबुल कुत्र्याचा मृत्यू; टॉक्सिकॉलॉजीचा अहवाल प्रलंबित

सात वर्षाच्या मुलावर हल्ला केलेल्या पिटबुल कुत्र्याचा शवविच्छेदन तपासणी अहवालात धक्कादायक खुलासा. एकाहून अधिक अवयवांतून रक्तस्त्राव झाल्याने कुत्र्याचा मृत्यू झाल्याची माहिती. मृत कुत्र्याचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. टॉक्सिकॉलॉजीचा अहवाल प्रलंबित.

कोलवाळ पोलीस निरीक्षकासह तपास अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मंत्र्यांची मागणी

कामुर्ली येथील एका प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकत असलेल्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांकडून तपास कामात हलगर्जीपणा. पोलिसांना कायद्याचे ज्ञान कमी असल्याने योग्य कलमे जोडली नाहीत. पोलीस निरीक्षकासह तपास अधिकाऱ्याची बदली न करता दोघांना तातडीने निलंबन करण्याची थिवीचे आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची मागणी.

विद्यार्थ्याला शिक्षा देणं भोवलं, दोन्ही शिक्षिकांना अखेर अटक

कामुर्ली येथील एका प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकत असलेल्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांकडून दोन्ही शिक्षिकांना अखेर अटक. सुजल गावडे व कनिषा गडेकर अशी शिक्षिकांची नावे आहेत. काल या शिक्षिकांचे निलंबन झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT