Goa live news in Marathi Dainik Gomantak
गोवा

Goa News: अग्निशमन व आपत्कालीन सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री पदक प्रदान, वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Today's 19 December 2025 News Live Updates In Marathi: गोवा जिल्हा परिषद निवडणूक, सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल, राजकारण, पर्यटन, गुन्हे यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

अग्निशमन व आपत्कालीन सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री पदक

६5 व्या गोवा मुक्तिदिनाच्या निमित्ताने गोवा सरकारकडून अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री पदके (प्रशंसनीय सेवा व शौर्य) प्रदान करण्यात येणार आहेत. अग्निशमन सेवेतील निष्ठावान व आदर्श सेवेसाठी नीलेश फर्नांडिस, स्टेशन फायर ऑफिसर; जंगा आर. गोहार, लीडिंग फायर फायटर; आणि अनिकेत ए. आमोणकर, फायर फायटर यांना प्रशंसनीय सेवा पदके देण्यात येणार आहेत.

सप्टेंबर २०२४ मध्ये धबधब्यावर झालेल्या बचाव मोहिमेदरम्यान दाखवलेल्या अपवादात्मक धैर्याबद्दल अविनाश यू. गायकवाड, फायर फायटर यांना शौर्यपदक प्रदान करण्यात येणार आहे. ही पदके १९ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या अधिकृत गोवा मुक्तिदिन समारंभात प्रदान करण्यात येतील.

‘वेल्डिंग’मुळे बेतूल येथे लागली आग

बेतूल येथील ओएनजीसीत वेल्डिंगचे काम चालू असताना अचानक आग लागण्याची घटना गुरुवारी घडली. इंडिया एनर्जी वीक कार्यक्रमानिमित्त येथे एका शेडच्या डागडुजीचे काम चालू होते. यावेळी प्रसंगावधान राखून दामोदर जांबावलीकर व मनोज नाईक यांनी आगीवर नियंत्रण ठेवले. मागाहून कुंकळ्ळी अग्निशामक दलाला संपर्क साधून पाचारण करण्यात आले. जवानांनी स्थिती आटोक्यात आणली. या दुर्घटनेत सुदैवाने मोठी हानी झाली नाही. वेल्डिंगच्या ठिणग्या ज्वलनशील पदार्थ्यांच्या संपर्कात आल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक कयास आहे.

नाताळ, नववर्षानिमित्त दक्षिण गोव्यात चोख पोलिस बंदोबस्त

नाताळ व नववर्षानिमित्त दक्षिण गोव्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली. पर्यटक तसेच लोकांना त्रास होऊ नये याची संपूर्ण दक्षता घेतली जाणार असल्याचेही वर्मा यांनी यावेळी सांगितले. 

सुरक्षेसाठी आयआरबी पोलिसांचीही  मदत घेतली जाणार आहे. या पोलिसांच्या दहा तुकडी दक्षिण गोव्यात ठिकठिकाणी तैनात केल्या जाणार आहेत. त्याशिवाय स्थानिक पोलिसही तैनात असतील. गर्दीच्या ठिकाणी हे पोलिस हजर असतील, त्याशिवाय नाकाबंदीही  सुरु असल्याची माहिती वर्मा यांनी दिली.  जनतेने कुठलीही अडचण झाल्यास १०० क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्रात 48 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त; सातारा, सोलापूरमध्ये कारवाई

महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या कारवाईत ४८ लाख रुपये किंमतीचे गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. सातारा आणि सोलापूर येथे ही कारावाई करण्यात आली.

गोवा इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. १४ वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाले तरी गोव्यात हर घर जल, हर घर बिजली, हर ग्राम सडक या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी केली आहे. या सोई - सुविधा लोकांपर्यंत पोहचल्या आहेत, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Goa Liberation Day: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमंतकीयांना दिल्या गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमंतकीयांनी गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India Squad T20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा; ईशान किशनचं कमबॅक, गिलचा पत्ता कट

Assam Train Accident: हत्तीच्या कळपाला धडकली राजधानी एक्सप्रेस, आठ हत्तींचा मृत्यू; ट्रेनही रुळावरुन घसरली

Panaji Smart City: पणजी स्मार्ट सिटीचे 92.25% काम पूर्ण; Watch Video

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

SCROLL FOR NEXT