Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुसळधार पाऊस, अपघात; गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

Goa Marathi Latest News Today 30 August 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Amunekar

सुपारीच्या सालींचा वापर करून तयार केली पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

नगरगाव-आंबेडे, सत्तरी येथील आदित्य बोट्टरकर यांनी यंदाही आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती सुपारीच्या सालींचा वापर करून अत्यंत आकर्षक पद्धतीने साकारली आहे. गेली २० वर्षे ते दरवर्षी आपल्या घरीच गणेश मूर्ती तयार करतात. कुटुंबीयांच्या सहकार्याने साकारलेली ही मूर्ती पाहण्यासाठी दरवर्षी अनेकजण आवर्जून भेट देतात.

 Dhargal Accident: धारगळ येथे कारची दुचाकीला धडक, एक गंभीर जखमी

धारगळ येथे भरधाव वेगाने चालवलेल्या चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार गौरेश धारगळकर (वय २५) गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

Heavy Rain In Goa: राज्यात मुसळधार पावसाचे थैमान; गावसावाडा-म्हापशात भिंत कोसळून घराचे नुकसान

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे अशा घटना घडत आहेत. गावसावाडा-म्हापसा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे एका पडीक घराची भिंत कोसळली. या घटनेत शेजारी राहणाऱ्या प्रसाद कैरकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.

कचरा संकलनाचा टेम्पो उलटला; चार कामगार जखमी

वार्का येथील रावणफोंडकडून नावेलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा संकलनासाठी जाणारा टेम्पो उलटला. या अपघातात चार कामगार जखमी झाले, त्यापैकी दोन गंभीर आहेत. जखमींना तातडीने ईएसआय इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरु केला आहे.

Goa Rain Update: राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी १.८१ इंच पावसाची नोंद

राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी १.८१ इंच पावसाची नोंद झाली आहे. या काळात सांगे भागात सर्वाधिक २.८५ इंच पावसाची नोंद करण्यात आली. १ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राज्यात सरासरी ११२.८० इंच पावसाची नोंद झाली आहे,

विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू

जोगोलिमोल येथे आज एका दुर्दैवी घटनेत दोन भावांना मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, ते आपल्या गुरांसाठी गवत कापत असताना वीजेचा धक्का लागला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Porvorim: पर्वरीत रुग्णवाहिकेची मालवाहू वाहनाला धडक

पर्वरीच्या नवीन बायपास रोडवर आज एका रुग्णवाहिकेने मालवाहू वाहनाला धडक दिल्याने अपघात झाला. या रुग्णवाहिकेत गर्भवती महिला प्रवास करीत होती. सुदैवाने, या अपघातात ती महिला सुरक्षित राहिली. तिला पुढील उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) हलवण्यात आले.

Cloudburst In Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरच्या रामबन येथे ढगफुटी, तिघांचा मृत्यू

रामबन जिल्ह्यात आज सकाळी ढगफुटीची घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोन व्यक्ती अद्याप बेपत्ता आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव आणि शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरु केले असून, आपत्ती व्यवस्थापन दल, स्थानिक पोलिस आणि स्थानिक रहिवाशांची मदत घेण्यात येत आहे.

Pernem: पेडणेत गणरायाच्या दर्शनाला अवतरला 'मयूरराज'

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेडणेतल्या एका मंडपात अवघड दृश्य पाहायला मिळाले. बाप्पांच्या दर्शनाला चक्क एक मोर उपस्थित राहिला. बाप्पांच्या दर्शनासाठी आलेल्या या ‘मयूरराजा’मुळे पेडण्यातील गणेशभक्तांना दिव्य आणि अविस्मरणीय अनुभव मिळाला.

Goa Police: सार्वजनिक गणेश मंडळांसाठी पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था, 400 हून अधिक पोलीस तैनात

गोव्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर सुरक्षा व्यवस्था केली आहे. मंडळांमध्ये तसेच प्रमुख ठिकाणी रात्रीच्या गस्तीसाठी ४०० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांचा उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने यापूर्वी आयोजकांसह अनेक बैठकाही घेतल्या असून, विविध सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने मला श्रीमंत केले; गोव्यातील प्रसिद्ध मच्छीमार 'पेले'ने सांगितला अनुभव

ब्रेकअप के बाद... हृदय तुटल्यानंतर Google मधील अडीच कोटी पगाराच्या नोकरीवर मारली लाथ; सुरु केला स्वत:चा व्यवसाय

Asia Cup 2025 Schedule: आशिया कप स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत बदल, किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या

बायकोच्या अफेअरबाबत पतीला कळालं, डंबलने ठेचून तिने नवऱ्याला संपवलं

Heavy Rain In Sattari: मुसळधार पावसामुळे वेळूस नदी तुडुंब! बागायतीचेही नुकसान

SCROLL FOR NEXT