मायणा कुडतरी पोलीसांनी दवर्ली येथील ३३ वर्षीय तानवीर मुल्ला याला अटक केली आणि त्याच्या ताब्यातून ११७ ग्रॅम गांजा, ज्याची किंमत १०,००० रुपये आहे, जप्त केला आहे.
गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक डॉ. अजय गावडे यांनी मोठा गाजावाजा करत पदभार स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करायची की नाही, याचा निर्णय आता सरकारला घ्यावा लागणार आहे. राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीशीला २४ तासात गावडे यांनी उत्तर दिले आहे.
नावेली येथून दुचाकी चोरीप्रकरणी मडगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कलंदर हाबिगिरी (२३) व राज नायक (१९) अशी संशयितांची नावे आहेत. सध्या या दोघांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. साहाय्यक उपनिरीक्षक संतोष गावकर पुढील तपास करीत आहेत. पार्क करून ठेवलेली यामाहा मोटरसायकल कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार मेल्विटो मोन्तेरो यांनी मडगाव पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या महिन्याच्या १५ ते १६ तारखेदरम्यान चोरीची ही घटना घडली होती.
बोणबाग- बेतोडा येथे शुक्रवारी रात्री गांजा बाळगल्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी अतुल अशोक अस्काऊकर (२४, देऊळवाडा- बोरी) याला केली अटक. २१३००० रुपये किंमतीचा गांजा जप्त.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.