डिचोली शहरातील प्रसिद्ध 'नवा सोमवार' उत्सवाला आज (सोमवारी) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. सर्वत्र श्री शांतादुर्गा देवीचा जयघोष ऐकू येत असून, शहरात भक्ती आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.
प्रभू श्री रामचंद्र की जय..!गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या श्रीराम दिग्विजय यात्रेचे डिचोलीत भव्य स्वागत. शेकडो भाविकांनी यात्रेचे दर्शन घेऊन केली सेवा.
या पर्यटन हंगामातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज, 'सेलिब्रिटी मिलेनियम', सुमारे २००० प्रवाशांना घेऊन मुरगाव पोर्ट अथॉरिटीमध्ये (MPA) दाखल झाले. MPA चे वाहतूक व्यवस्थापक जेरोम क्लेमेंट यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल लवकरच तयार होईल आणि क्रूझ पर्यटनाला आणखी चालना मिळेल. प्रवाशांचे भव्य पारंपरिक स्वागत करण्यात आले, तसेच स्थानिक टूर ऑपरेटर आणि टॅक्सी संघटनांनी या पहिल्या जहाजाच्या आगमनामुळे व्यवसायात मोठी वाढ झाल्याचे नमूद केले.
दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, १५ वर्षीय नक्षत्रा नाईक हिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी (National Bravery Award) शिफारस केली आहे. नक्षत्राने वास्को, येथील तिच्या घरी दरोडा पडला असताना शौर्य दाखवत आपल्या कुटुंबाचा जीव वाचवला होता. खासदारांनी नक्षत्राचा 'गोव्याचा अभिमान' म्हणून उल्लेख केला असून, पंतप्रधानांच्या २८ नोव्हेंबर २०२५ च्या गोवा भेटीदरम्यान या पुरस्काराची घोषणा करण्याची सूचना त्यांनी पत्रात केली आहे.
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले आहे की, भाजपने (BJP) आपले जिल्हा परिषद (ZP) उमेदवार आधी जाहीर करावेत, त्यानंतरच काँग्रेस उमेदवारांची यादी देईल. भाजपचा पराभव करणे हे आमचे लक्ष्य आहे. भाजपने आपली यादी जाहीर करण्यास विलंबकेला आहे, कारण विरोधक एकत्र येऊन त्यांच्या विरोधात लढणार असल्याच्या भीतीने ते घाबरले आहेत. पाटकर यांनी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांना अनौपचारिकपणे जमिनीवर काम सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याचेही सांगितले.
आम आदमी पक्षाच्या उमेदवार श्रीमती पर्पेट मायकल डी'मेलो यांनी काल (रविवार) चोडण येथे त्यांच्या निवडणूक प्रचाराचा उत्साहात प्रारंभ केला. प्रचाराच्या शुभारंभापूर्वी त्यांनी माडेल येथील चर्च आणि भूमिका मंदिराचे आशीर्वाद घेतले. यावेळी 'आप'चे गोवा संघटन सरचिटणीस श्रीकृष्ण परब हे देखील उपस्थित होते.
गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित करण्यात आलेला पहिला "अँग्री स्टार्ट अप कॉनक्लेव्ह २०२५" पणजी जिमखान्यात संपन्न झाला. कृषी क्षेत्राला बळकट करणे, तसेच विद्यार्थी, तरुण पिढी आणि कृषी व्यावसायिकांना चालना देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. कृषी उपसमितीचे अध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले की, कृषी व्यवसायात कार्यरत असलेल्यांना आणि नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी योजना उपलब्ध आहेत. या वेळी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी तरुणांनी सरकारी नोकरीमागे न धावता, कृषी क्षेत्रात आपले करिअर करावे, असे आवाहन केले.
बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेन्द्र यांच्या दुःखद निधनामुळे, IFFI (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) च्या आयोजकांनी आजचे सर्व मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटसृष्टीतील या महान अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आगामी जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीतील गोंधळाबद्दल चर्चा करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या गोवा शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. 'आप'चे नेते वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, निवडणुकीच्या तारखा आणि नामनिर्देशन वेळापत्रक स्पष्ट झालेले नाही, कोणतीही प्रेस कॉन्फरन्स किंवा सर्वपक्षीय बैठक झाली नाही. तसेच, राया पंचायतीच्या आरक्षणात अचानक बदल झाल्यामुळे अगोदरच घोषित झालेल्या उमेदवारांवर परिणाम झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.