Goa Live Updates Dainik Gomantak
Live Updates

Goa News: मालिन जेटीजवळ भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 50-55 वर्षांच्या व्यक्तीला बसने चिरडले, मृत्यू

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Amunekar

कोलवा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताला अटक

कोलवा येथे एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अरविंद शर्मा (२४) याला अटक केली आहे. संशयित मूळ उत्तरप्रदेशातील असून, तो लयामाती दवर्ली येथे राहत होता. त्याच्यावर पोलिसांनी बलात्कार, बाल संरक्षण कायदा व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेऊन नंतर कोलवा पोलिसांच्या ताब्यात दिले. कोलवा येथील एका हॉटेलात लैगिक अत्याचाराची वरील घटना घडली होती. मागाहून याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंद झाली होती. पुढील पोलिस तपास चालू आहे.

Porvorim: पर्वरीतील एकाची 70 लाखांची फसवणूक, केरळमधील एकाला अटक

पणजी (प्रतिनिधी): गुंतवणूक ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यानंतर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून पर्वरीतील एकाची फसवणूक केल्याप्रकरणी केरळमधील एकाला अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्हे पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्याचे नाव प्रशांत बोस (वय ६२) असे आहे. ६९.७५ लाख रुपयांची फसवणूक त्याने केल्याचा आरोप आहे. ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे सांगून त्याने पर्वरीतील तक्रारदाराला भुलवले होते.

Canacona: काणकोण येथील व्यापाऱ्याची 1 लाख रुपयांची फसवणूक

काणकोण येथील एका व्यापाऱ्याला १ लाख ८,६७० रूपयांना ठकवले. यासंदर्भात भवानी इलेक्ट्रॉनिक्सचे मालक गणपतलाल चौधरी यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. २९ नोव्हेंबरला पुजा कन्स्ट्रक्शन या अस्थापनाचे नाव सांगून एकाने १ लाख ८६७० रूपये किंमतीचे पोलिकॅब खरेदी केले. त्याने त्यावेळी पेंमेंटची स्क्रीन शॉट पाठवली व माल घेऊन गेला. मात्र, पेंमेट मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी ‘आयफीएस’ व अन्य बॅक तपशील चुकीचा असल्याने दुसऱ्या दिवशी सर्व पैसै देतो हे सांगून परत गेला मात्र, आजपर्यंत पैसे मिळाले नाहीत, असे चौधरी यांनी सांगितले. या संदर्भात पोलिस उपनिरीक्षक बांबू देसाई तपास करीत आहेत.

Cash For Job: 'कॅश फॉर जॉब'ची राष्ट्रपतींकडून दखल

राज्यातील ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाची राष्ट्रपती कार्यालयाने दखल घेतली असून गोव्याच्या मुख्य सचिवांनी त्यासंबंधीचा अहवाल द्यावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

स्थानिक युवक ज्ञानेश्वर वरक यांनी यासंबंधी राष्ट्रपती कार्यालय, मुख्यमंत्री, दक्षता खात्याकडे लेखी तक्रार केली होती. या प्रकरणारतील संशयित पूजा नाईक हिने आपण ६० जणांना सरकारी नोकरी मिळवून दिल्याचा दावा केल्यानंतर ५ वर्षात विविध खात्यांमध्ये झालेल्या नोकर भरती विषयी उमेदवारांची उपस्थिती पत्रक आणि ओएमआर शीट वरील सहीची पुर्नतपासणी करण्यात यावी, अशी मागणी वरक यांनी तक्रारीत केली आहे.

वागातोर येथील 'CO2 क्लब' सील

गोवा प्रशासनाने वागातोर येथील ओझरान क्लिफवरील 'CO2 क्लब' आज सील केला आहे. क्लब सील करण्यामागे दोन मुख्य कारणे समोर आली आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे, २५० लोकांची क्षमता असलेला हा नाईट क्लब अग्निशमन विभागाच्या 'ना हरकत प्रमाणपत्राशिवाय' (Fire Department NOC) चालवला जात होता. दुसरे म्हणजे, क्लबच्या इमारतीच्या रचनात्मक सुरक्षिततेत समस्या आढळल्या आहेत. सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याने, प्रशासनाने ही कठोर कारवाई केली आहे.

उपसरपंच सुषमा नागवेकर यांच्यासह तीन पंचायती सदस्य चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये

हडफडे येथील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेसंदर्भात चौकशीसाठी हडफडे पंचायतीच्या तीन सदस्यांना हणजूण पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. यामध्ये उपसरपंच सुषमा नागवेकर यांच्यासह विनंती मोरजकर आणि स्टेफी फर्नांडिस यांचा समावेश आहे. क्लबला दिलेल्या परवानग्या आणि नियमांमधील कथित त्रुटींबाबत पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

गोवा सरकारने एसआयआर (SIR) अंतर्गत 91% जनगणना केली पूर्ण

गोवा सरकारने SIR अंतर्गत जनगणनेचे काम ९१% पर्यंत पूर्ण (Completes 91%) केले आहे. या आकडेवारीनंतर आता येत्या १६ डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी (Draft Electoral Roll) प्रकाशित केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

महत्त्वाचा निकाल! गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने 7 वर्षांच्या मुलीला भारतीय नागरिकत्वाचा दिला हक्क

गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात, गोव्यात जन्मलेल्या ७ वर्षांच्या मुलीला भारतीय नागरिकत्वाचा हक्कदार ठरवले आहे. तसेच, पासपोर्ट अधिकाऱ्यांना तिला भारतीय पासपोर्ट जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, मुलीच्या जन्माच्या वेळी तिचे ब्रिटिश वडील वैध निवास व्हिसावर असल्यामुळे ते 'बेकायदेशीर स्थलांतरित' नव्हते. या आधारावर न्यायालयाने मुलीच्या बाजूने हा निर्णय दिला.

मालिन जेटीजवळ भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 50-55 वर्षांच्या व्यक्तीला बसने चिरडले, मृत्यू

मालिन जेटी जवळ एक दुर्दैवी अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका व्यक्तीचा बसखाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बसने प्रवास सुरू ठेवला की नाही, याबद्दल अधिक तपशील मिळालेले नाहीत. या घटनेची अधिक माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा 'राऊडी'पणा महागात, महागड्या गोलंदाजीनंतर अम्पायरनं फटकारलं; काय घडलं नेमकं? VIDEO

25 जणांचे बळी घेणाऱ्या नाईट क्लब आगीच्या दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखल; बेकायदा बांधकामे, व्यवसाय रडारवर

Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

Suryakumar Yadav: 'आता हा शॉट खेळू नको' सूर्याच्या खराब कामगिरीवर गावसकर नाराज, दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

Bike Stunt Video: दुचाकीवरुन 6 पठ्ठ्यांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्स संतापले

SCROLL FOR NEXT