शनिवारी रात्री उशिरा मोबोर बीचवर झालेल्या ट्रॉलर अपघातामुळे २७ मच्छिमारांना धोका निर्माण झाला होता, या सर्वांना संयुक्त मोहिमेत वाचवण्यात आले. जीवरक्षक सतीश गावकर, समीर गावकर आणि लवू गावकर यांनी किनाऱ्यावरचे पोलिस आणि स्थानिक रहिवासी फ्रान्ससिओ फेरेंडेस (पेले) यांच्यासह जेट स्की आणि इतर मदतीचा वापर करून मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी आणले.
गोवा जिल्हा रुग्णालयातील एक रुग्णवाहिका रविवारी सकाळी अपघातग्रस्त झाली. रुग्णाला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी घेऊन जात असताना गिरी सर्व्हिस रोडवरील खराब रस्त्यामुळे ही रुग्णवाहिका उलटली. सुदैवाने या अपघातात रुग्णाला कोणतीही दुखापत झाली नाही. तत्काळ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन रुग्णाला सुरक्षितपणे दुसऱ्या रुग्णवाहिकेत हलवले आणि पुढील उपचारासाठी जीएमसी येथे रवाना केले.
गोव्याचे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी माहिती दिली आहे की, वीज खात्यातील नवीन प्रकल्पासाठी जैका या संस्थेमार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
गोव्यात पुढील तीन दिवस हवामान बदलत राहणार असून १ ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील विविध भागांत अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.