Goa live news Dainik Gomantak
Live Updates

Goa Live News: आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांना कोलवाळ पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. "आम्हाला फक्त मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना रस्ता रुंदीकरणावरील प्रलंबित चर्चेबद्दल विचारपूस करायची होती. जीएसटी रॅलीदरम्यान, मी मंत्री नीळकंठ यांना या मुद्द्याबाबत ग्रामसभेला उपस्थित राहण्यास त्यांच्या अनिच्छेबद्दल विचारपूस केली. त्यांना प्रश्न विचारण्याचा माझा अधिकार होता. माझ्यासोबतच, इतर आरजीपी सदस्यांविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली, जरी त्यांना प्रश्न विचारणारा मी एकटाच होतो," असे कोलवाळ पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर मनोज परब म्हणाले.

शारदोत्सवाची धूम

शारदोत्सवाची धूम. डिचोलीत विविध शाळांनी सरस्वती पुजनोत्सवाला प्रारंभ. मुलांचा आनंद द्विगुणित. विविध कार्यक्रमांचे आयोजन.

केटीसीएल चालक आणि कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यालयाबाहेर एक दिवसाचे उपोषण

केटीसीएल चालक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यात केटीसीएल व्यवस्थापन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ पर्वरी येथील कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यालयाबाहेर एक दिवसाचे उपोषण केले.

ओंकार हत्तीने दोन दिवस महाराष्ट्रात काढल्यानंतर पुन्हा तोरसे भागात परतला

ओंकार हत्तीने दोन दिवस महाराष्ट्रात काढल्यानंतर पुन्हा तोरसे भागात परतला त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा भयभीत झाले आहे महाराष्ट्र कास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात शेतीची नुकसानी करत ओमकार ने तोरसे परिसरात प्रवेश केला.

कुर्टी-खांडेपार पंचायतीचे सरपंच निळकंठ नाईक यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव

कुर्टी-खांडेपार पंचायतीचे सरपंच निळकंठ नाईक यांच्या विरुद्ध ७ पंच सदस्यांकडून अविश्वास ठराव दाखल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'तो परत आलाय!' पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे धाबे दणाणले; महाराष्ट्रात गेलेल्या ओंकार हत्तीचा U-Turn

Mopa: 'आमच्या जमिनी गेल्या, नोकरी नाही, टॅक्सी तरी चालवू द्या'! मोपा पार्किंग शुल्कप्रकरणी आंदोलन; 3 ऑक्टोबरला खास बैठक

Goa Opinion: गोव्याची जमीन लुटणाऱ्या प्रमुख गुन्हेगारांना ओळखून, त्यांना हरवण्यासाठी आपण एकत्र येऊ शकतो का?

गोव्यात एक काळ असा होता, हॉटेलात तुमचे पैसे विसरले तर नंतर सहज परत मिळायचे; वाढत्या हिंसक घटना आणि मानसिकता

आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानची नांगी ठेचल्यानंतर 'सूर्यकुमार' गोव्यात, क्रिकेट मैदानाचे करणार उद्घाटन

SCROLL FOR NEXT