बांदोडा येथील बूथ क्रमांक २३ मधील सर्व ११९ मतदार हे सनातन आश्रमचे साधक. बोगस मतदार नाही. काँग्रेस नेत्यांनी लोकांची दिशाभूल करू नये - बांदोडा पंचायत मंडळ
मुंगुलमध्ये झालेल्या संघर्षाला कारणीभूत ठरलेल्या वाढत्या गुन्ह्यांबद्दल आणि अपुरी गस्त घालण्याबद्दल आपचे आमदार कॅप्टन व्हेंझी यांनी पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासह दक्षिण गोवा एसपींना निवेदन सादर केले.
कुंक्कळीमधील स्वातंत्र्यसैनिक स्मारकाची अवस्था अतिशय दयनीय आहे. महान स्वातंत्र्यसैनिक शाबू देसाई यांचे पुत्र विशाल देसाई म्हणाले की,कुंक्कळी परिषदेला या महत्त्वाच्या वारसा स्थळांचे पुनर्संचयित आणि संवर्धन करण्यात कोणताही रस नाही.
वास्कोचे रस्ते देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमले. केशव स्मृती हायस्कूलने आयोजित केलेल्या तिरंगायात्रेला आमदार कृष्णा साळकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
यावर्षी शून्य विद्यार्थी पटसंख्या असल्याने १ कोकणी माध्यमाची शाळा आणि ६ मराठी माध्यमाची सरकारी प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यापैकी ५ शाळा दक्षिण गोव्यात आणि २ शाळा उत्तर गोव्यात आहेत.
आजपासून पुढील 5 दिवस राज्यात पाऊस कायम. हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी.
डिचोलीत स्मारकांची स्वच्छता. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी घेतला हातात झाडू.भाजपच्या स्वच्छता अभियानांतर्गत हुतात्मा स्मारकासह महात्मा गांधीजी आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ स्वच्छता.
गुंतवणूक घोटाळ्यात डिचोलीमधील माणसाची ४.६८ लाख रुपयांची फसवणूक.
वाळपई मतदार संघातर्फे तिरंगा यात्रा रॅली मंत्री विश्वजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न
मुंगुल हल्ला प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत विल्सन कार्व्हालो, रसोल (मडगाव) आणि शारुख (दावर्ली) यांना अटक करण्यात आली आहे. अधिक अटक होण्याची शक्यता आहे. तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.