Goa live news Dainik Gomantak
Live Updates

Goa News: भाजप उमेदवार रघुवीर कुंकळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला; मंत्री बाबूश मॉन्सेरात यांची खास उपस्थिती

Goa Breaking Marathi News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी; राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या बातम्या

गोमंतक ऑनलाईन टीम

हडफडे आग दुर्घटना: 'प्लास्टिक सर्जरी' विभागात दाखल 3 रुग्णांची प्रकृती स्थिर; आठवडाभरात मिळणार डिस्चार्ज

हडफडे येथील आग दुर्घटनेत जखमी झालेले आणि प्लास्टिक सर्जरी विभागात दाखल असलेल्या तीन रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तिन्ही रुग्णांना १२ ते १५ टक्के भाजले असून, त्यांना पुढील सात दिवसांच्या आत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

हडफडे दुर्घटनेनंतर प्रशासनाची धडक कारवाई; वागातोर पाठोपाठ असगाव येथील 'रोमिओ लेन' रिसॉर्टला सील

आरपोरा येथील भीषण दुर्घटनेनंतर बार्देस मामलेतदार यांनी अवैध आस्थापनांवर कारवाईचा धडाका लावला आहे. रविवारी वागातोर येथील एक व्यावसायिक परिसर सील केल्यानंतर, आता त्यांनी असगाव येथील 'रोमिओ लेन'चे बुटीक रिसॉर्ट देखील सील केले आहे.

मार्शेल रस्त्यावर गवंडाळी येथे भीषण अपघात; एक मुलगी गंभीर जखमी, अधिक माहितीची प्रतीक्षा

मार्शेलकडे जाणाऱ्या मार्गावर, गवंडाळी येथे एक मोठा अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अधिक तपशील येणे बाकी असून, जखमी मुलीला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'या दुःखद घटनेने मन हेलावले', क्लब मालक सौरभ लुथरा यांची इन्स्टाग्रामवर पोस्ट

हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण आग दुर्घटनेत २५ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर क्लबचे मालक सौरभ लुथरा यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन जारी केले.

आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, व्यवस्थापन या दुःखद जीवितहानीमुळे अत्यंत व्यथित झाले आहे. व्यवस्थापन पीडित आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी सहाय्य, समर्थन आणि सहकार्य पुरवेल.

भाजप नेत्यांच्या चुलत भावांचा गोव्यात अवैध नाईट क्लब व्यवसायात सहभाग! – विजय सरदेसाईंचा थेट आरोप

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप करत, भाजपच्या उच्च नेत्यांचे चुलत भाऊ गोव्यातील नाईट क्लबच्या नावाखाली अवैध व्यवसायात गुंतलेले आहेत, असे म्हटले आहे.

सरदेसाई यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे की, जर त्यांचा हा आरोप खोटा असेल, तर भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत या मुद्द्यावर चर्चा करावी आणि 'याच मुद्द्यावर निवडणूक लढवावी'. सरदेसाई म्हणाले, "मी माझा आरोप सिद्ध करून दाखवेन."

बेताळभाटी उमेदवारी अर्ज प्रक्रियेत राजकीय नाट्य! 'भाजप समर्थकांना प्रवेश, तर मला नकार' आमदार वेन्झी व्हिएगस यांचा आक्षेप

बेताळभाटीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान रिटर्निंग ऑफिसर यांच्यासमोर आक्षेप नोंदवला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अर्ज दाखल करण्याच्या वेळी भाजपच्या अधिक समर्थकांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता, तर आपल्याला मात्र रिटर्निंग ऑफिसरने प्रवेश नाकारला

भाजप उमेदवार रघुवीर कुंकळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला; मंत्री बाबूश मॉन्सेरात यांची खास उपस्थिती

भाजपचे उमेदवार रघुवीर कुंकळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री बाबूश मॉन्सेरात आणि ताळगाव पंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची जयंती 13 डिसेंबर रोजी; मिरामार येथील स्मृतीस्थळावर अभिवादन

भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची जयंती शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने मिरामार येथील स्मृती स्थळावर त्यांना अभिवादन करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: तुमच्या इच्छा पूर्ण होतील! 'या' राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या संपूर्ण भविष्य!

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

जबरदस्त डाइव्ह मारली, पण नशिबानं साथ दिली नाही, 'तो' थरारक रनआऊट पाहून धोनीच्या आऊटची आठवण ताजी; VIDEO व्हायरल

Goa Nightclub Fire: रोमियो लेन दुर्घटना प्रकरणात गोवा पोलिसांना मोठं यश! फरार आरोपींविरुद्ध 'ब्लू कॉर्नर'चा फास; इंटरपोलकडून नोटीस जारी

इंडोनेशिया हादरलं! जकार्तामधील सात मजली इमारतीला भीषण आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VEDIO

SCROLL FOR NEXT