Goa Live News Dainik Gomantak
Live Updates

Goa News: इनोव्हा आणि रिक्षा यांच्यात अपघात

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर बातम्या

Manish Jadhav

डिचोलीत 24नोव्हेंबरला 'नवा सोमवार'; शांतादुर्गा देवीचा प्रसिद्ध उत्सव रंगणार

डिचोलीच्या श्री शांतादुर्गा देवीचा प्रसिद्ध 'नवा सोमवार' 24 नोव्हेंबर रोजी. यंदाही रंगणार मुंबईतील नामवंत गायकांच्या मैफिली.

डिचोलीत भीषण अपघात! जीपगाडीची झाडाला धडक; कर्नाटकमधील तिघे गंभीर जखमी

डिचोली येथील बगलमार्गावर व्हाळशी जंक्शनजवळ शनिवारी (1 नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात कर्नाटकमधील तीन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीपगाडीवरील (Jeep) चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला जाऊन धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की, जीपगाडीचे मोठे नुकसान झाले.

पर्यटनमंत्र्यांच्या आरोपांनंतर काँग्रेस आमदार कार्लोस फेरेरांकडून 'त्या' आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी

हळदोणाचे आमदार ॲड. कार्लोस फेरेरा यांनी 'ओशनमॅन इव्हेंट' (Oceanman event) वादाच्या संदर्भात एका आयपीएस अधिकाऱ्यावर 'मनमानी' (High-handedness) केल्याच्या आरोपावरुन तातडीने कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याकडे केली आहे. फेरेरा यांनी स्पष्ट केले की, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्वतः सार्वजनिकरित्या या आयपीएस अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचे आरोप केले असल्याने त्यांनी त्यांच्याच आरोपांवर त्वरित कृती करणे आवश्यक आहे.

खारेबांद येथे अज्ञाताचा आढळला मृतदेह, पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद

खारेबांद येथे एक अनोळखी मृतदेह आढळला. ही व्यक्ती अंदाजे ७५ ते ८० वयोगटातील आहे. पोलिस तपासात तो भिकारी असल्याचे आढळून आले आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मडगाव पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. उपनिरीक्षक समीर गावकर पुढील तपास करीत आहे. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याबद्दल विजय सरदेसाई यांनी भाजप सरकारवर केली टीका!

"पोलिसांनी बंदूकधारी बनवल्याने कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. या भाजप सरकारच्या काळात गुंड गणवेश घालतात आणि गोंयकार भीतीने जगतात. गोवा गुंडागिरीला नव्हे तर प्रशासनाला पात्र आहे." : विजय सरदेसाई, जीएफपी अध्यक्ष

कायदा आणि सुव्यवस्था कोसळल्याबद्दल युरी आलेमाओ यांनी भाजप सरकारवर केली टीका

विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी भाजप सरकारवर गोव्यातील पोलिस ठाण्यांना "गुंडा गँग" बनवल्याचा आरोप केला. पोलिस गुन्हेगारी, बेकायदेशीर संग्रह आणि ड्रग्जमध्ये गुंतलेले आहेत असा आरोप केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा ऱ्हास होणे ही सरकारसाठी "मोठी लाजिरवाणी गोष्ट" आहे असे ते म्हणाले.

मोले भगवान महावीर अभयारण्यासमोरील राष्ट्रीय महामार्गवर अपघात

मोले भगवान महावीर अभयाअरण्यासमोरील राष्ट्रीय महामार्गवर रात्री उशीरा सेलेरो कार साकवाच्या आर्कला धडकली त्यामुळे गाडीचे पुर्ण नुकसान झाले. गाडीमध्ये असलेले चालकांसहीत दोघे जणांना किरकोळ जखम झाली.

कार्तिकी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विठ्ठलापूर साखळीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्रींचे दर्शन घेतले

कार्तिकी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विठ्ठलापूर साखळीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्रींचे दर्शन घेतले व सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यानिमित्त मंदिरपरिसरात आलेल्या वारकरी मंगळांसह वारीतही मुख्यमंत्री सहभागी झाले.

परप्रांतीयांचे दर स्वस्त, गोमंतकीय व्यवसाय फिका

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सणासुदीच्या काळात स्थानिक फुलविक्रेत्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही, तुळशी विवाह या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी म्हापसा बाजाराबाहेर परप्रांतीय विक्रेत्यांनी खुलेआम फुलांची विक्री केल्याचे विदारक चित्र समोर आले. यामुळे स्थानिकांचा व्यवसाय पूर्णपणे थंडावला आणि गोव्यातील फुलविक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

नाईटक्लबच्या बाउन्सर्सनी बनारसमधील पाच पर्यटकांवर केला क्रूर हल्ला

व्हागातोरमध्ये झालेल्या एका धक्कादायक घटनेत, शनिवारी रात्री उशिरा एका लोकप्रिय नाईटक्लबच्या बाउन्सर्सनी बनारसमधील पाच पर्यटकांवर क्रूर हल्ला केला.

इनोव्हा आणि रिक्षा यांच्यात अपघात

इनोव्हा क्रिस्टाचा वेग जास्त असल्याने, इनोव्हा आणि रिक्षा यांच्यात अपघात, मोरजी येथील मलेकरवाडा येथे स्थानिक रिक्षा चालक आणि एक शेतकरी जखमी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA Final 2025: हरमनची टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप चॅम्पियन'; वुल्फर्टची झुंजार शतकी खेळी ठरली व्यर्थ; दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्याने केली कमाल! VIDEO

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

Bicholim Accident: डिचोलीत जीपगाडीची झाडाला धडक, कर्नाटकमधील तिघेजण जखमी; सहा पर्यटक सुखरूप

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

वागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

SCROLL FOR NEXT