IND vs NZ Ist T20 Match: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना उद्या (27 जानेवारी) संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल.
लेगस्पिनर यजुवेंद्र चहलला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली तर तो एक मोठा रेकॉर्ड करु शकतो. तो T20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याच्या अगदी जवळ आहे.
दरम्यान, या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजुवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 1 बळी घेतल्यास तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनू शकतो.
सध्या भारताचा T20 मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 90 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर, चहलच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 90 विकेट आहेत.
तसेच, या T20 मालिकेत भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा (Team India) भाग नाही, अशा परिस्थितीत चहलकडे हा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे.
दुसरीकडे, चहलने या मालिकेत एकूण 2 विकेट घेतल्यास तो टी-20 मध्ये 300 विकेट घेणारा पहिला भारतीय देखील बनू शकतो. यामध्ये सर्व T20 सामने समाविष्ट आहेत. त्याने आतापर्यंत 263 टी-20 सामन्यात एकूण 298 विकेट घेतल्या आहेत.
टी-20 व्यतिरिक्त, यजुवेंद्र चहलचे आकडे एकदिवसीय क्रिकेटमध्येही चांगले आहेत. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 72 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्याकडे 5.26 च्या इकॉनॉमीसह 121 विकेट आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.