Stuart Broad | Yuvraj Singh Dainik Gomantak
क्रीडा

Stuart Broad Retirement: 'खरा दिग्गज! तुझा प्रवास...' युवराजकडून स्टुअर्ट ब्रॉडला निवृत्तीच्या खास शुभेच्छा

Yuvraj Singh: स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंगने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Pranali Kodre

Yuvraj Singh special Social Media Post for Stuart Broad after announcement of retirement:

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून शनिवारी (२९ जुलै) निवृत्ती घोषित केली आहे. त्यामुळे सध्या द ओव्हलवर सुरू असलेला ऍशेस २०२३ मालिकेतील पाचवा सामना त्याचा कारकिर्दीतील अखेरचा सामना आहे. दरम्यान, त्याच्या निवृत्तीबद्दल अनेक आजी-माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने देखील ब्रॉडला त्याच्या कारकिर्दीबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. युवराजने सोशल मीडियावर ब्रॉडसाठी पोस्ट केली असून 2007 टी20 वर्ल्डकपमधील त्यांचा फोटोही शेअर केला आहे.

युवराजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की 'स्टुअर्ट ब्रॉड तुझे कौतुक. तुझ्या शानदार कसोटी कारकिर्दीसाठी अभिनंदन. लाल चेंडूच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि घातक गोलंदाजांपैकी एक आणि खरा दिग्गज. तुझा प्रवास आणि समर्पण खूप प्रेरणादायी आहे. पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा ब्रॉडी.'

दरम्यान, युवराज आणि ब्रॉड यांचे नाव एका खास गोष्टीमुळे एकमेकांशी जोडले गेले आहे. टी20 वर्ल्डकप 2007 मध्ये डर्बन येथे त्याच्याविरुद्ध भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने सलग 6 षटकार मारले होते.

त्यावेळी ब्रॉड केवळ 21 वर्षांचा होता. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिला गोलंदाज बनला होता, ज्याच्या एका षटकात सलग 6 षटकार मारण्यात आले होते. तसेच युवराज आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सलग 6 षटकार मारणारा पहिला फलंदाज बनला होता. पण त्या घटनेनंतरही युवराज आणि ब्रॉड यांनी आपापल्या देशासाठी शानदार कामगिरी करत दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

या घटनेबद्दल निवृत्तीची घोषणा करतानाही ब्रॉडने प्रतिक्रिया दिल होती. तो म्हणाला, 'तो दिवस खरंच कठीण होता. तेव्हा मी 21 किंवा 22 वर्षांचा असेल. मी खूप शिकलो. मी त्या अनुभवानंतर माझे पूर्ण मानसिक रुटीन तयार केली. मी माझ्या तयारीला लागलो, माझे कोणतेही गोलंदाजीच्या आधीचे रुटीन नव्हते, माझे लक्ष केंद्रित नव्हते.'

'मी त्यानंतर माझा 'वॉरियर मोड' तयार करायला लागलो. शेवटी माझी हिच इच्छा होती की ते व्हायला नव्हते पाहिजे. पण तो सामना डेड रबर होता, त्यामुळे आम्ही वर्ल्डकपमधून बाहेर जाणार नव्हतो, याच गोष्टीने मला मदत झाली. पण मला वाटते की त्यामुळे मी आज जसा आहे, तसा एक प्रतिस्पर्धी बनलो. त्याने मला पुढे नेले.'

ब्रॉडने त्याच्या कारकिर्दीत 167 कसोटी सामने खेळले असून 602 विकेटस (29 जुलै 2023 पर्यंत) घेतल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 1 शतक आणि 13 अर्धशतकांसह 3647 धावांचा समावेशही आहे.

त्याने 121 वनडे सामने खेळले असून यामध्ये त्याने 178 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 529 धावा केल्या आहेत. ब्रॉडने त्याच्या कारकिर्दीत 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 65 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT