Stuart Broad: युवीच्या 6 सिक्सबद्दल कारकिर्दीचा शेवट करताना ब्रॉड बोललाच, 'त्या घटनेनंतर मी...',

Stuart Broad: युवराज सिंगने सलग 6 षटकार मारण्याच्या घटनेबद्दल स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती घेताना प्रतिक्रिया दिली आहे.
Stuart Broad | Yuvraj Singh
Stuart Broad | Yuvraj SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Stuart Broad on impact of Yuvraj Singh's six sixes in t20 World Cup 2007:

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने शनिवारी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे सध्या ऍशेस 2023 मालिकेतील द ओव्हलवर सुरू असलेला 5 वा कसोटी सामना त्याचा कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना असणार आहे.

दरम्यान, इंग्लंडचा यशस्वी गोलंदाज ठरलेल्या ब्रॉडच्या कारकिर्दीची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. कारकिर्दीतील केवळ आठवाच आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळताना त्याला मोठा धक्का बसला होता.

टी20 वर्ल्डकप 2007 मध्ये डर्बन येथे त्याच्याविरुद्ध भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने सलग 6 षटकार मारले होते. त्यावेळी ब्रॉड केवळ 21 वर्षांचा होता. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिला गोलंदाज बनला होता, ज्याच्या एका षटकात सलग 6 षटकार मारण्यात आले होते. पण त्यानंतर ब्रॉडने स्वत:ला सावरत आता दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

Stuart Broad | Yuvraj Singh
Ashes 2023: अँडरसनसाठी 41 वा वाढदिवस इमोशनल, जिगरी दोस्त ब्रॉडची सुटणार साथ

दरम्यान, याबद्दल त्याला त्याने निवृत्ती घेतल्यानंतर विचारण्यात आले. त्यावेळी त्याने सांगितले की त्या घटनेने त्याला मजबूत केले आणि चांगला प्रतिस्पर्धी बनण्यास मदत झाली.

ब्रॉड म्हणाला, 'तो दिवस खरंच कठीण होता. तेव्हा मी 21 किंवा 22 वर्षांचा असेल. मी खूप शिकलो. मी त्या अनुभवानंतर माझे पूर्ण मानसिक रुटीन तयार केली. मी माझ्या तयारीला लागलो, माझे कोणतेही गोलंदाजीच्या आधीचे रुटीन नव्हते, माझे लक्ष केंद्रित नव्हते.'

'मी त्यानंतर माझा 'वॉरियर मोड' तयार करायला लागलो. शेवटी माझी हिच इच्छा होती की ते व्हायला नव्हते पाहिजे. पण तो सामना डेड रबर होता, त्यामुळे आम्ही वर्ल्डकपमधून बाहेर जाणार नव्हतो, याच गोष्टीने मला मदत झाली. पण मला वाटते की त्यामुळे मी आज जसा आहे, तसा एक प्रतिस्पर्धी बनलो. त्याने मला पुढे नेले.'

ब्रॉडने बेन स्टोक्सचेही उदाहरण दिले. 2016 टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात सलग चार चेंडूवर स्टोक्सविरुद्ध कार्लोस ब्रेथवेटने चार षटकार मारत वेस्ट इंडिजला विश्वविजेते बनवले होते. पण त्यानंतर स्टोक्सने 2019 चा वनडे वर्ल्डकप आणि 2022 चा टी20 वर्ल्डकप इंग्लंडला जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Stuart Broad | Yuvraj Singh
Stuart Broad retirement: ऍशेस कसोटी सुरु असतानाच ब्रॉड अचानक निवृत्त! 17 वर्षे गाजवले क्रिकेटचे मैदान

ब्रॉड म्हणाला, 'तुम्ही कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहाता. जेव्हा तुम्ही स्टोक्ससारख्या खेळाडूंच्या कारकीर्दीकडे पाहता, तेव्हा लक्षात येते त्यानेही असेच केले आहे. ही पुनरागमनाची क्षमता आहे आणि ती क्षमता तुमच्या वाईट दिवसांना मागे ठेवण्यासाठी सक्षम असते.'

'गेल्या 15-16 वर्षात मला एक गोष्ट नक्की कळाली आहे, ते म्हणजे क्रिकेटमध्ये चांगल्यापेक्षा वाईट दिवस जास्त येतील. त्यामुळे तु्म्हाला त्याचा सामना करावा लागेल, जेणेकरून तुम्ही तुमचे चांगले दिवसाला आणखी चांगले करू शकाल.'

ब्रॉडने त्याच्या कारकिर्दीत 167 कसोटी सामने खेळले असून 602 विकेटस (29 जुलै 2023 पर्यंत) घेतल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 1 शतक आणि 13 अर्धशतकांसह 3647 धावांचा समावेशही आहे.

त्याने 121 वनडे सामने खेळले असून यामध्ये त्याने 178 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 529 धावा केल्या आहेत. ब्रॉडने त्याच्या कारकिर्दीत 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 65 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com