New Zealand vs Pakistan, Toss Boy Letter Instagram/blackcapsnz
क्रीडा

'एक दिवस मी सुद्धा न्यूझीलंडसाठी...', NZ vs PAK T20I सामन्यात 'टॉस बॉय' म्हणून निवडलेल्या चिमुकल्याचे भावूक पत्र

New Zealand vs Pakistan, Toss Boy Letter: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात जानेवारीमध्ये झालेल्या एका टी20 सामन्यात विल नावाच्या छोट्या मुलाची टॉस बॉय म्हणून निवड झाली होती. त्याने याबद्दल एक पत्र लिहिले आहे.

Pranali Kodre

A Young Boy Wrote emotional letter After Picked As Coin Toss Kid For New Zealand vs Pakistan T20I Match at Hamilton:

पाकिस्तानने जानेवारीच्या मध्यात न्यूझीलंड दौरा केला होता. या दौऱ्यात झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी विल नावाच्या एका छोट्या मुलाची टॉस बॉय म्हणून निवड झाली होती. आता त्याने लिहिलेलं एक भावनिक पत्र व्हायरल होत आहे.

14 जानेवारी 2024 रोजी न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात सेडन पार्क, हेमिल्टन येथे टी20 मालिकेतील दुसरा सामना झाला होता. या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांसह आणि सामनाधिकाऱ्यांसह नाणेफेकीसाठी मैदानात जाण्याची संधी छोट्या विलला मिळाली होती.

ही संधी मिळाल्याबद्दल झालेला आनंद विलने एका पत्रात मांडला आहे. त्याने लिहिलेल्या पत्राचा फोटो न्यूझीलंडने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या पत्रात विलने लिहिले 'न्यूझीलंड (BlackCaps) आणि पाकिस्तान संघात सेडन पार्क, हेमिल्टनला काल रात्री झालेल्या सामन्यासाठी मला कॉईन टॉस किड म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद. मला ते आवडले आणि मला अनेक खेळाडूंच्या स्वाक्षरी माझ्या बॅटवर मिळाल्या.'

'मी सुरुवातीला थोडा धास्तावलो होतो, पण सर्वजण माझ्याशी चांगले वागले. एक दिवस मी देखील न्यूझीलंडसाठी खेळेल. काल रात्री मला तसे करून दिल्याबद्दल धन्यवाद.'

विलचे हे पत्र सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, त्याला त्या सामन्यावेळी इश सोधी आणि डॅरिल मिचेल या न्यूझीलंडच्या खेळाडूंबरोबर फोटो काढण्याचीही संधी मिळाली होती.

दरम्यान, त्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शाहिन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 194 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडकडून फिन ऍलेनने 41 चेंडूत 74 धावांची खेळी केली. होती. तसेच कर्णधार केन विलियम्सन 26 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला होता. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तनला 19.3 षटकाच सर्वबाद 173 धावाच करता आल्या होत्या. पाकिस्तानकडून बाबर आझमने 66 धावांची आणि फखर जमानने 50 धावांची अर्धशतकी खेळी केल्या होत्या.

मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नव्हते.न्यूझीलंडकडून ऍडम मिलनेने 4 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT