Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

Yashasvi Jaiswal: टीम इंडियातील निवडीनंतर जयस्वालची आली प्रतिक्रिया; म्हणाला, 'वडिलांना सांगितलं तेव्हा...'

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी यशस्वी जयस्वालची भारताच्या कसोटी संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे.

Pranali Kodre

Yashasvi Jaiswal react on his Selection in Indian Test Team: शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 21 वर्षीय यशस्वी जयस्वाललाही संधी मिळाली आहे.

जयस्वालला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 ते 11 जून दरम्यान झालेल्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी त्याला भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळाले होते. पण आता मुख्य संघातही त्याने स्थान मिळवले आहे.

जयस्वालला कसोटी संघात चेतेश्वर पुजाराच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर खेळवले जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

दरम्यान, भारतीय संघात मिळालेल्या संधीबद्दल जयस्वाल खूप खुश असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की 'हा तोच क्षण आहे, ज्याचे मी आयुष्यभर स्वप्न पाहात होतो.'

जयस्वालसाठी हा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला राहिला आहे. आझाज मैदानावर राहाण्यापासून, पाणीपुरी विकण्यापासून ते भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला.

त्याने आझाद मैदानाच्या झाडावरून चढून आपल्या रुममेटबरोबर आयपीएल सामने पाहाण्याच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की 'मी माझ्या रुममेटला सांगितले होते की एक दिवस तू मला वानखेडे स्टेडियमच्या लाईट्समध्ये खेळताना पाहाशील.' जयस्वालने त्याचे हे स्वप्न यंद्याच्या आयपीएलमध्ये पूर्णही केले.

पण इतके यश मिळाल्यानंतरही जयस्वालने अजून खूप काही करायचे असल्याचे सांगितले आहे. त्याने सांगितले की 'मला हा खेळ खूप आवडतो आणि मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे.' तसेच त्याने असेही सांगितले की त्याला त्याच्या कुटुंबायांसाठी आणखी खूप काही करायचे असून त्यांना आनंदी ठेवायचे आहे.

याबरोबरच पीटीआयशी बोलताना जयस्वालने सांगितले की ज्यावेळी त्याच्या निवडीबद्दल त्याच्या वडिलांना सांगितले, तेव्हा त्यांना रडू कोसळले होते. तो म्हणाला, 'जेव्हा मी माझी निवड झाल्याचे माझ्या वडिलांना सांगितले, तेव्हा ते रडू लागले. मी माझ्या आईला भेटलेलो नाही, कारण मी काही कामामुळे आणि सराव सत्रासाठी बाहेर आहे.'

जयस्वाल लवकरच बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्याच्या तयारीसाठी जाणार आहे. तो म्हणाला, 'मी संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. मी भारतासाठी खेळण्यास उत्सुक आहे. मी आयपीएलनंतर नेट्समध्ये सराव करत आहे.'

  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT