Latest ICC Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) खेळाडूंची नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाने अलीकडेच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा 1-0 ने पराभव केला.
या मालिकेत भारतीय खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट होती, ज्याचा फायदा त्यांना ताज्या कसोटी क्रमवारीत झाला आहे. या मालिकेतून पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वालने ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याचबरोबर, कर्णधार रोहित शर्मालाही फायदा झाला आहे.
दरम्यन, टीम इंडियाचा (Team India) युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल ICC कसोटी क्रमवारीत 63 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहे. यशस्वीने पोर्ट ऑफ स्पेन येथे अनिर्णित राहिलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध 57 आणि 38 धावांची खेळी खेळली.
आता त्याचे 466 गुण आहेत. दुसऱ्या कसोटीत 80 आणि 57 धावा करणाऱ्या रोहितचे 759 गुण आहेत. विशेष म्हणजे, तो श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेसोबत नवव्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबुशेन आणि इंग्लंडचा जो रुट अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अव्वल स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, ऋषभ पंत एका स्थानाने घसरुन 12व्या तर विराट कोहली 14व्या स्थानावर आहे. इंग्लंडचा जॅक क्रॉली 35 व्या स्थानावर पोहोचला आहे.
तसेच, हॅरी ब्रूक 11व्या आणि जॉनी बेअरस्टो संयुक्तपणे 19व्या स्थानावर आहे. टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या यादीत अव्वल तर रवींद्र जडेजा सहाव्या स्थानावर आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) 33 व्या स्थानावर पोहोचला आहे.
श्रीलंकेचा प्रभात जयसूर्या करिअरमधील सर्वोत्तम सातव्या क्रमांकावर आहे. रमेश मेंडिस एका स्थानाने प्रगती करत 21 व्या स्थानावर पोहोचला आहे, जडेजा आणि अश्विन पहिल्या दोन स्थानांवर आहेत, तर अक्षर पटेल अष्टपैलूंच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.