Yashasvi Jaiswal  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI 1st Test: कसोटी पदार्पणापूर्वी 21 वर्षीय यशस्वी बीसीसीआयच्या पॉडकास्टमध्ये म्हणाला होता...

IND vs WI 1st Test Match: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे.

Manish Jadhav

IND vs WI 1st Test Match: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना डोमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळवला जात आहे. या सामन्यातून युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

तत्पूर्वी यशस्वीने मालिका सुरु होण्यापूर्वी कसोटी क्रिकेटबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला की, क्रिकेटचा खरा फॉरमॅट कसोटी आहे आणि या फॉरमॅटमध्ये मला खेळायचे आहे.

बीसीसीआय पॉडकास्टवर ऋतुराज गायकवाडशी (Ruturaj Gaikwad) बोलताना 21 वर्षीय यशस्वीने सांगितले की, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची निवड झाल्याबद्दल त्याला पहिल्यांदा कळले तेव्हा त्याला खूप आनंद झाला.

यशस्वी म्हणाला की, “मला खूप आनंद झाला. माझ्यासाठी कसोटी हा क्रिकेटचा खरा फॉरमॅट आहे. मात्र जेव्हा, मी भारतीय संघाचा एक भाग होणार आहे हे समजल्यावर मला खूप आनंद झाला. मला नेहमीच कसोटी संघाचा भाग व्हायचे होते.''

त्याचवेळी, रोहितने यशस्वीबद्दल सांगितले की, "भारतीय क्रिकेटला डावखुऱ्या फलंदाजाची नितांत गरज होती. आणि विशेष म्हणजे, यशस्वीच्या रुपात आम्हाला अत्यंत ताडबतोब डावखुरा फलंदाज मिळाला. तो एक प्रॉमिसिंग खेळाडू आहे. त्याचबरोबर, गिल गेल्या एक वर्षापासून शानदार फॉर्म आहे. मला आशा आहे की, तो असाच खेळत राहील.''

दुसरीकडे, यशस्वीने आयपीएल (IPL) 2023 मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने 14 सामन्यात 48.08 च्या सरासरीने 625 धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याने एक शतक आणि 5 अर्धशतके झळकावली.

यशस्वीच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 80.21 च्या सरासरीने 1845 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 9 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली.

त्याने यंदाच्या इराणी चषकात शेष भारतासाठी पहिल्या डावात 213 आणि दुसऱ्या डावात 144 धावा केल्या. त्याने 32 लिस्ट ए आणि 57 देशांतर्गत टी-20 सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे 1511 आणि 1578 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT