Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मुंबईच्या धाकडची 'दहाड'! 13 चेंडूत फिफ्टी ठोकत यशस्वी जैस्वालने मोडला KL राहुलचा रेकॉर्ड

IPL 2023: राजस्थान रॉयल्सचा डावखुरा सलामीवीर आणि भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने केकेआरविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात ऐतिहासिक फलंदाजी केली.

Manish Jadhav

IPL 2023: राजस्थान रॉयल्सचा डावखुरा सलामीवीर आणि भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने केकेआरविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात ऐतिहासिक फलंदाजी केली.

त्याने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक ठोकून लीगच्या इतिहासातील एक मोठा विक्रम मोडला. त्याने केएल राहुलचा सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडला. जैस्वालने डावाच्या पहिल्याच षटकात केकेआरचा कर्णधार नितीश राणाला 26 धावा काढल्या.

दरम्यान, 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने राजस्थानसाठी पहिल्याच चेंडूपासून तूफानी फटकेबाजी सुरु केली.

नितीश राणाच्या पहिल्याच षटकात त्याने दोन षटकार आणि तीन चौकारांसह 26 धावा काढल्या. यानंतर, दुसऱ्याच षटकात त्याने हर्षित राणालाही शानदार षटकार आणि चौकार लगावला.

त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या तिसऱ्या षटकात तीन चौकार मारत त्याने 13 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत इतिहास रचला.

आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक करणारे खेळाडू

यशस्वी जैस्वाल - 13 चेंडू विरुद्ध केकेआर, 2023

केएल राहुल - 14 चेंडू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 2018

पॅट कमिन्स - 14 चेंडू विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2022

युसूफ पठाण - 15 चेंडू विरुद्ध एसआरएच, 2014

सुनील नरेन - 15 चेंडू विरुद्ध आरसीबी, 2017

यासह, यशस्वी जैस्वाल आयपीएलच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.

नितीश राणाच्या गोलंदाजीवर 26 धावा काढत त्याने आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात महागडे षटक बनवले.

तसेच, आयपीएलच्या (IPL) या मोसमात 500 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय आणि फाफ डू प्लेसिसनंतर दुसरा खेळाडू ठरला.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक

27/0 - RCB विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), 2011 (अतिरिक्त: 7)

26/0 - राजस्थान रॉयल्स विरुद्ध KKR, 2023 (या सामन्यात)

26/0 - केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2013 (अतिरिक्त: 1)

25/0 - दिल्ली कॅपिटल्स वि केकेआर, 2021 (अतिरिक्त: 1)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Zoho Mail: Gmail, Yahoo विसरा आता देशी ई-मेल वापरा; झोहोवर वैयक्तिक आणि बिझनेस मेल कसा तयार कराल? Step By Step प्रोसेस

SCROLL FOR NEXT