Yashasvi Jaiswal X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: जयस्वालचा जलवा कायम! रांचीत अर्धशतक ठोकत मोडला सेहवाग-गांगुलीचे मोठे विक्रम

Yashasvi Jaiswal Record: रांचीमध्ये इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीतही भारताकडून यशस्वी जयस्वालने अर्धशतक ठोकत सेहवाग-गांगुलीच्या मोठ्या विक्रमांना मागे टाकले आहे.

Pranali Kodre

Yashasvi Jaiswal breaks Virender Sehwag and Sourav Ganguly's Record during India vs England 4th Test in Ranchi:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात रांचीमध्ये शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यातही भारताचा दमदार फॉर्ममध्ये असेलल्या यशस्वी जयस्वालने शानदार कामगिरी केली.

या सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 353 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला होता. भारताकडून कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीला उतरला. मात्र भारताने सुरुतालाच काही विकेट्स गमावल्या.

मात्र असे असतानाही जयस्वालने भारताचा डाव सांभाळताना अर्धशतक झळकावले. याबरोबरच त्याने मोठे विक्रमही केले आहेत. जयस्वालने भारताकडून पहिल्या डावात 117 चेंडूत 73 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला.

गांगुलीचा मोडला विक्रम

यासह डावखुरा फलंदाज जयस्वालने आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 7 डावात 618 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो भारताकडून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा डावखुरा फलंदाज ठरला आहे. त्याने हा विक्रम करताना सौरव गांगुलीला मागे टाकले आहे.

गांगुलीने पाकिस्तानविरुद्ध 2007 मध्ये झालेल्या कसोटीत 534 धावा केल्या होत्या. त्याखालोखाल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर गौतम गंभीर आहे. गंभीरने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 463 धावा आणि न्यूझीलंडविरुद्ध 2009 मध्ये 445 धावा केल्या होत्या.

एकाच कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे डावखुरे फलंदाज

  • 618 धावा - यशस्वी जयस्वाल (विरुद्ध इंग्लंड, 2024)

  • 534 धावा - सौरव गांगुली (विरुद्ध पाकिस्तान, 2007)

  • 463 धावा - गौतम गंभीर (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2008)

  • 445 धावा - गौतम गंभीर (विरुद्ध न्यूझीलंड, 2009)

सेहवागलाही टाकले मागे

याबरोबरच जयस्वावने 2024 मध्ये आत्तापर्यंत पाचच सामने खेळले असूनही 16 वर्षांपूर्वीचा विरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला आहे. जयस्वालने 2024 मध्ये कसोटीत 5 सामन्यातील 9 डावात 23 षटकार मारले आहेत.

त्यामुळे आता एका वर्षात भारताकडून कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमातही जयस्वालने सेहवागला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. सेहवागने 2008 साली 14 सामन्यातील 27 डावात 22 षटकार मारले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंत असून त्याने 2022 मध्ये 7 सामन्यांत 21 षटकार मारले होते.

भारताकडून कसोटीमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू

  • 23 षटकार - यशस्वी जयस्वाल (2024)

  • 22 षटकार - विरेंद्र सेहवाग (2008)

  • 21 षटकार - ऋषभ पंत (2022)

  • 20 षटकार - रोहित शर्मा (2019)

  • 18 षटकार - मयंक अगरवाल (2019)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT