Yashasvi Jaiswal - Shivam Dube PTI
क्रीडा

ICC T20I Ranking: शिवम दुबेने रोहित, गिललाही टाकले मागे, तर जयस्वाल - अक्षर टॉप-10 मध्ये

ICC T20I Ranking: आयसीसीने ताजी टी20 क्रमवारी जाहीर केली असून यात भारताच्या शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि अक्षर पटेलने मोठी झेप घेतली आहे.

Pranali Kodre

Latest ICC T20I Ranking:

जून 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यादृष्टीने आता संघांनी तयारी करणे सुरू केले असून विविध संघ टी20 मालिक खेळत आहे, त्यामुळे टी२० क्रमवारीतही अनेक बदल होताना दिसत आहेत. नुकतेच बुधवारी (17 जानेवारी) आयसीसीने ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे.

या क्रमवारीत शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल अशा भारतीय खेळाडूंनी मोठी प्रगती केली आहे. भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळत असून या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली झाली आहे.

शिवम दुबेने तब्बल 207 क्रमांकाने मोठी झेप घेत फलंदाजी क्रमवारीत 58 वे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे टी20 क्रमवारीत फलंदाजीच्या यादीत दुबेने शुभमन गिल, रोहित शर्मा, केएल राहुल या खेळाडूंनाही मागे टाकले आहे.

गिल 60 व्या क्रमांकावर, केएल राहुल 65 आणि रोहित 68 व्या क्रमांकावर आहे. तसेच विराट कोहली 44 व्या क्रमांकावर आहे. दुबेने अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या दोन्ही टी20 सामन्यात अर्धशतके केली होती.

दुबेव्यतिरिक्त फलंदाजांमध्ये यशस्वी जयस्वालनेही मोठी भरारी घेतली आहे. त्याने पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता 7 व्या क्रमांकावर आला आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी20मध्ये केलेल्या 34 चेंडूतील 68 धावांच्या खेळीने त्याला पहिल्या 10 फलंदाजांमध्ये येण्यात मदत झाली आहे.

फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर भारताचा सूर्यकुमार यादव कायम आहे. तसेच ऋतुराज गायकवाडही पहिल्या 10 जणांमध्ये आहे. तो 9 व्या क्रमांकावर आहे.

तसेच फलंदाजांमध्ये न्यूझीलंडच्या फिन ऍलेनने 11 स्थानांनी प्रगती करत 16 वे स्थान मिळवले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध चालू असलेल्या टी20 मालिकेत शानदार कामगिरी केली आहे.

गोलंदाजीत अक्षर पटेलची मोठी झेप

भारताचा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू अक्षर पटेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 जणांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने 12 स्थानांची झेप घेत रवी बिश्नोईला मागे टाकत 5 वा क्रमांक पटकावला आहे. तो सध्या सर्वोच्च क्रमवारी असलेला भारतीय गोलंदाज आहे.

त्याच्यापाठोपाठ 6 व्या क्रमांकावर बिश्नोई आहे. पहिल्या 10 जणांमध्ये अक्षर आणि बिश्नोई हे दोनच भारतीय गोलंदाज आहेत. गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंडचा आदिल राशिद आहे.

याशिवाय श्रीलंकेकडून झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत केलेल्या शानदार कामिगिरीमुळे महिश तिक्षणा आणि वनिंदू हसरंगा यांनीही पहिल्या तीन गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. हसरंगाने झिम्बाब्वेविरुद्ध एका टी20 सामन्यात 7 विकेट्स घेण्याचाही कारनामा केला होता.

हसरंगा आणि तिक्षणा संयुक्तरित्या 680 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा अकिल हुसैन आहे.

दुबेची अष्टपैलू खेळाडू म्हणूनही प्रगती

दुबेने फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीतही अफगाणिस्तानविरुद्ध चमक दाखवली होती. ज्याचा फायदा त्याला झाला असून आता तो टी20 क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत 210 स्थानांची झेप घेत 59 व्या क्रमांकावर आला आहे.

दरम्यान, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या 10 जणांमध्ये भारताचा केवळ हार्दिक पंड्या आहे. तो पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच त्यानंतर 16 व्या क्रमांकावर अक्षर पटेल आहे. या यादीत अवव्ल क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब अल हसन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT