virat kohali 3.jpg
virat kohali 3.jpg 
क्रीडा

WTC Final: न्यूझीलंडचा भारतावर विजय; टेस्टचा पहिला विश्वचषक विल्यमसनच्या संघाकडे

गोमंन्तक वृत्तसेवा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) आज न्यूझीलंडने भारताचा (india) 8 गडी राखुन पराभव केला. केन विल्यमसनच्या (Ken Williamson) नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने टेस्ट क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकत नवा विक्रम इंग्लंड (England) मध्ये बनवला. 

गेल्या 2 वर्षापासून सुरु असलेल्या आयसीसीच्या टेस्ट विश्वचशकचा आज अखेर शेवट न्यूझीलंडने (New Zealand) गोड करत मानाची गदा पटकावली आहे. 2015 आणि 2019 मध्ये न्यूझीलंडला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र या संघाने संयम दाखवत मानाचा तुरा रोवला आहे.साउदम्टनच्या मैदानात न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावत दिवस वाया घालवला. 

दुसऱ्या दिवशी भारताचे रोहित शर्मा आणि शुभमन गिल फार काळ मैदानात टिकु शकले नाहीत मात्र कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताचा डाव सावरला. पण तिसऱ्या दिवशी दोघेही लवकर बाद झाले. तळाच्या फलंदाजीत अश्विनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताला 217 पर्यंत मजल मारता आली. जेमिसन ने भारताचे 5 गडी माघारी पाठवले. न्यूझीलंडच्या संघाने कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 249 धावा केल्या. भरताकडून मोहम्मद शमी ने 5 गडी बाद केले.

न्यूझीलंड संघाची 32 धावांची आघाडी पार करत भारताचा दुसरा डाव अवघ्या 170 मध्ये गारदला. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला 139 धावांचे लक्ष मिळाले होते. किविज ने हे सोपे आव्हान 8 गडी राखून पार केले. यात कर्णधार विल्यम्सन (52)आणि रॉस टेलर (47) यांनी महत्वाची खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Goa Today's Live News: देवसा येथे घरफोडी; 1.65 लाखांचा मुद्देमाल लंपास

Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

Margao Corporation Building : मडगाव पालिका इमारत दुरुस्ती करा;पोर्तुगीजकालीन प्रशासकीय इमारत जीर्ण

Death Due To Fasting: निर्जळी उपवास बेतला जीवावर, फोंड्यात बिहारच्या युवतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT