WTC Final: भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहे. उभय संघांमधील हा सामना 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघातील अनेक खेळाडू आधीच लंडनला पोहोचले आहेत. दरम्यान, टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्टार यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनला फायनलच्या काही दिवस आधी दुखापत झाली.
दरम्यान, शुक्रवारी (26 मे) आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या क्वालिफायरदरम्यान ईशानला दुखापत झाली. 16व्या षटकाच्या समाप्तीनंतर ईशान जखमी झाला. मैदानावर त्याची ख्रिस जॉर्डनशी टक्कर झाली. जॉर्डनचा कोपर किशनच्या डोळ्याला लागला. त्यानंतर ईशान मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी विष्णू विनोदने यष्टीरक्षण आणि फलंदाजी केली.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या सुरुवातीच्या संघात किशन नव्हता. केएल राहुलला दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याची निवड करण्यात आली.
टीम इंडियामध्ये (Team India) किशनशिवाय दुसरा यष्टीरक्षक केएस भरत आहे. ईशानला अद्याप कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
तो बाहेर पडल्यास केएस भरत आणि संघ व्यवस्थापनावर दबाव वाढेल. त्याला दुखापत होऊ नये अशी भारतीय संघ आणि करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.
किशनला प्रथम श्रेणी क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्याने 48 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 38.76 च्या सरासरीने 2985 धावा केल्या आहेत. किशन अजून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली होती, मात्र तो प्लेइंग-11 मध्ये सहभागी होऊ शकला नाही.
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध जेतेपदाच्या लढतीत त्याला अखेरचा पराभव स्वीकारावा लागला होता.
कसोटी चॅम्पियनशिपच्या 2021-23 हंगामात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. गुणतालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर मोहम्मद पटेल, शार्दुल पटेल, शार्दुल शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.