Rahul Dravid - Ajinkya Rahane Dainik Gomantak
क्रीडा

Rahul Dravid on Ajinkya Rahane: 'कोणत्याही दगडावर लिहिलेलं नाही की...' रहाणेच्या पुनरागमनावर कोच द्रविडची मोठे भाष्य

तब्बल 18 महिन्यांनी टीम इंडियात पुनरागमन करत असलेल्या अजिंक्य रहाणेबद्दल प्रशिक्षक राहुल द्रविडने मोठे भाष्य केले आहे.

Pranali Kodre

Rahul Dravid on Ajinkya Rahane Comeback: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 जूनपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना द ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यातून भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जवळपास 18 महिन्यांनी पुनरागमन करण्यासाठी अजिंक्य राहणे सज्ज आहे.

त्यामुळे त्याच्याबद्दल सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना द्रविडने त्याला खास सल्लाही दिला आहे.

द्रविड म्हणाला, 'सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्याचे संघात असणे चांगले आहे. काही दुखापतग्रस्त खेळाडू असल्याने कदाचीत त्याला पुन्हा संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्यासारखे कौशल्य असलेला खेळाडू संघात परत येणे, आमच्यासाठी चांगले आहे.'

'तो संघात खूप अनुभव घेऊन येतो. त्याने परदेशात चांगली कामगिरी केली आहे. त्याने भारतासाठी इंग्लंडमध्येही काही शानदार खेळी केल्या आहेत. तो स्लीपमधील चांगला क्षेत्ररक्षक आहे. त्याने संघाला लक्षणीय यश मिळवून दिले आहे आणि आता त्याने या सामन्याला (अंतिम सामन्याला) साधारण सामन्याप्रमाणे पाहू नये, असे मला वाटते.'

तसेच द्रविड पुढे म्हणाला, 'तुम्ही कधी संघातून वगळले जाता, पण तुम्ही पुनरागन करू शकता आणि तुम्ही तोपर्यंत खेळणे कायम करू शकता, जोपर्यंत तुम्ही चांगले खेळत आहात आणि कामगिरी करत आहात. कोणच्याही दगडावर लिहिलेले नाही किंवा असा कोणताही नियम नाही की तुम्हाला फक्त एक सामनाच मिळणार आहे. जर रहाणेने चांगली कामगिरी केली, तर पुढे काहीही होऊ शकते.'

'कोणाला माहित आहे की कोणते खेळाडू कधी दुखापतीनंतर परत येतील, तुम्हाला माहित नसते की पुढे काय होणार आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे फक्त या सामन्याबाबत नाही. होय, हा सामना महत्त्वाचा आहे, पण नंतरदेखील बरेच क्रिकेट खेळले जाणार आहे.'

रहाणेने भारताकडून अखेरचा कसोटी सामना जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. पण आता त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. रहाणेची मागील काही महिन्यामध्ये देशांतर्गत क्रिकेट हंगामात आणि आयपीएल 2023 मध्ये शानदार कामगिरी राहिली आहे.

अजिंक्य रहाणेने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 82 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये त्याने 38.52 सरासरीने 4931 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 12 शतकांचा आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे.

रहाणे डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान पार पडलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेत मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने या रणजी स्पर्धेत 7 सामन्यांमध्ये 57.63 च्या सरासरीने 634 धावा केल्या. यामध्ये त्याच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने हैदराबादविरुद्ध हे द्विशतक ठोकले होते. तसेच त्याने आसामविरुद्ध 191 धावांची खेळीही केली होती.

त्याचबरोबर आयपीएल 2023 मध्येही त्याने शानदार कामगिरी करताना 14 सामन्यांमध्ये 32.60 च्या सरासरीने आणि 172.49 च्या स्ट्राईक रेटने 326 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT