Team India Dainik Gomantak
क्रीडा

WTC Points Table: धरमशाला विजयानंतर भारताला मोठा फायदा, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मागे टाकत घेतली आघाडी

WTC 2023-25 Points Table: भारताने इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली आहे.

Manish Jadhav

WTC 2023-25 Points Table: भारताने इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी हरल्यानंतर रोहित शर्माच्या टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन करत पुढचे चार सामने जिंकले. याचाच फायदा आता भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये झाला आहे. टीम इंडियाने पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रतिस्पर्ध्यांवर त्याने मोठी आघाडी मिळवली आहे.

गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी

दरम्यान, धरमशाला येथे एक डाव आणि 64 धावांनी मिळवलेल्या विजयामुळे टीम इंडियाचे अव्वल स्थान मजबूत झाले आहे. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर भारत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या गुणांची (पीसीटी) टक्केवारी 64.5 होती. आता धरमशाला विजयानंतर ती 68.51 झाली आहे.

सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारताने 9 पैकी 6 टेस्ट जिंकल्या आहेत. दुसरीकडे, इंग्लंड सातव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर घसरला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे आतापर्यंत 19 गुणांचे नुकसान झाले आहे. श्रीलंका दोन सामन्यांतील पराभवासह गुणतालिकेत तळाशी आहे.

न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी

न्यूझीलंड 5 सामन्यांनंतर 60 पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे. सध्याच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने या सायकलमध्ये 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. त्याच्या खात्यात 59.06 पीसीटी आहेत. दोन्ही संघांमधील क्राइस्टचर्चमधील दुसऱ्या कसोटीनंतर गुणतालिकेत पुन्हा बदल दिसू शकतो.

दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माच्या टीम इंडियासमोर आता बांगलादेश आणि न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. टीम इंडिया दोन्ही संघांविरुद्ध एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे. यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये त्याचे आयोजन केले जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसह भारत सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचा शेवट करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT