Wriddhiman Saha Dainik Gomantak
क्रीडा

Wriddhiman Saha ने का सोडले बंगाल क्रिकेट, कोणत्या संघात करणार एन्ट्री?

रिद्धिमान साहाबद्दल (Wriddhiman Saha) अलीकडेच, एक मोठी बातमी आली होती.

दैनिक गोमन्तक

रिद्धिमान साहाबद्दल अलीकडेच, एक मोठी बातमी आली होती. त्याने बंगाल क्रिकेट संघापासून फारकत घेतली. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (सीएबी) अधिकाऱ्याने यासंबंधीची घोषणा केली होती. आता साहानेच याप्रकरणावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. (Wriddhiman Saha Speak About Leaving Bengal Cricket Team And Joining The New Team Ranji Trophy)

वास्तविक, हा सगळा वाद सीएबीच्या अधिकाऱ्याने साहाच्या बांधिलकीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर उद्भवला होता. त्याने IPL 2022 च्या मध्यात बंगाल संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे रणजी ट्रॉफी बाद फेरीत बंगाल संघासोबत खेळणार नसल्याचे त्याने सांगितले होते. साहाने म्हटले होते की, या सर्व गोष्टींमधून जाणे माझ्यासाठी खूप कठीण होते.

साहा म्हणाला, ''माझ्यासाठीही खूप वाईट गोष्ट आहे की, इतके दिवस बंगालकडून खेळल्यानंतर मला या सगळ्यातून जावे लागले. लोक अशा टीका करतात. माझ्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात हे खूप निराशाजनक आहे. एक खेळाडू म्हणून मी यापूर्वी अशा गोष्टी पाहिल्या नव्हत्या, पण आता पाहत आहे. मला आता पुढे जायचे आहे."

अजून ठरवले नाही

याबाबत साहाने CAB अध्यक्षांना फोनवरुन माहिती दिली होती. परंतु आता मी स्वतः भेटून पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार असल्याचे साहाने सांगितले. साहा पुढे म्हणाला, “बंगालकडून मी खेळणार नाही, असे मी ठरवले आहे. CAB चे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांना फोनवरुन याची माहिती दिली आहे. पण आता मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटेन आणि जी काही औपचारिकता असेल ती पूर्ण करेन.''

अनेक लोकांशी बोलत आहे

साहा आता रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) बाद फेरीत दिसणार नाही. पुढच्या हंगामात तो कोणत्या संघात खेळणार हे त्याने अजून ठरवलेले नाही. आपली अनेक लोकांशी चर्चा सुरु असल्याचे साहाने म्हटले आहे. तो म्हणाले, “मी अनेकांशी बोललो आहे, परंतु अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. पुढच्या हंगामात अजून बराच वेळ आहे."

साहाने 2007 मध्ये बंगालकडून पदार्पण केले. त्याने बंगालसाठी 122 लिस्ट-ए सामने खेळले असून 6423 धावा केल्या आहेत. त्याने लिस्ट-ए मध्ये बंगालसाठी 102 सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने 2762 धावा केल्या आहेत. साहाने अलीकडेच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या नव्या संघासह आयपीएल-2022 चे विजेतेपद पटकावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT