WPL 2024 Details
WPL 2024 Details PTI
क्रीडा

WPL 2024: मुंबई-दिल्ली पहिल्या सामन्यात आमने-सामने; जाणून घ्या महत्त्वाचे नियम, संघ अन् कधी व कुठे पाहाणार सामने

Pranali Kodre

WPL 2024 Squad, Venue, dates, Schedule and live streming details:

वूमन्स प्रीमियर लीगला गेल्यावर्षी सुरुवात झाली. 2023 मध्ये झालेल्या डब्ल्युपीएलच्या पहिल्या हंगामाला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता डब्ल्युपीएलचा दुसरा हंगाम शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) सुरू होत आहे.

पहिलाच सामना बंगळुरुमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जाणार आहे. या दोन संघांनी गेल्यावर्षी अंतिम सामन्यात धडक मारली होती, ज्यात मुंबईने विजेतेपद पटकावले, तर दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

पाच संघात रंगणार थरार

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाच्या हंगामातही मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, युपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या पाच संघात मिळून एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. यात साखळी फेरीतील 20 आणि 2 प्ले ऑफचे सामन्यांचा समावेश आहे.

कुठे होणार सामने

डब्लुपीएल 2024 चा हंगाम 23 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. 22 पैकी पहिले 11 सामने बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवले जाणार आहे.

तसेच नंतरचे 11 सामने, ज्यात प्लेऑफच्या सामन्यांचाही समावेश आहे, हे सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. सर्व 22 सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता चालू होतील.

कुठे पाहू शकतो सामने?

हे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहता येतीलच, पण स्पोर्ट्स 18 चॅनेलवर आणि जिओ सिनेमा ऍव व वेबसाईटवरही या हंगामातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

हे नियम देखील महत्त्वाचे

आयपीएल प्रमाणे डब्ल्युपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे नाणेफेकीवेळी कर्णधाराने सांगितलेले 11 खेळाडूच संपूर्ण सामन्यात खेळतील. याला केवळ कन्कशन सब्स्टिट्युट नियमाचा अपवाद असेल.

तसेच प्रत्येक डावात सामन्यातील दोन्ही संघाना प्रत्येकी 2 डीआरएस रिव्ह्यू दिले जातील. तसेच आयपीएल प्रमाणे संघ वाईड आणि नो-बॉल तपासण्यासाठीही डीआरएसचा वापर करू शकतात.

याशिवाय आयपीएल प्रमाणेच डब्ल्यूपीएलमध्ये देखील संघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 परदेशी खेळाडूंनाच खेळवण्याची परवानगी आहे. पण या नियमात थोडा बदल केलेला आहे, तो म्हणजे जर एखाद्या संघात आयसीसीच्या सहसदस्य देशांमधील (associate nation) खेळाडू असेल, तर तिच्यासह चार अन्य परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.

यंदा केवळ गुजरात जायंट्स संघात आयसीसीच्या सहसदस्य असलेल्या स्कॉटलंड संघाची कॅथरिन ब्रायस आहे. त्यामुळे जर तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले, तर गुजरातला तिच्यासह अन्य चार परदेशी खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवता येणार आहेत.

असे आहेत संघ -

  • मुंबई इंडियन्स - अमनजोत कौर, एमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतीमनी कलिता, नतालिया स्कायव्हर-ब्रंट, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया, शबनीम इस्माईल, एस सजना, अमनदीप कौर, फातिमा जाफर, एसबी कीर्तना.

  • दिल्ली कॅपिटल्स - ॲलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मॅरिझन कॅप, मेग लॅनिंग (कर्णधार), मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), तीतास साधू, ॲनाबेल सदरलँड, अपर्णा मंडल (यष्टीरक्षक), अश्विनी कुमारी.

  • युपी वॉरियर्स - एलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा, डॅनी वॅट, वृंदा दिनेश, पूनम खेमनार, सायमा ठाकूर, गौहर सुलताना, चामरी अटापट्टू.

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - आशा शोबाना, दिशा कासट, एलिस पेरी, इंद्राणी रॉय, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग, ऋचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, जॉर्जिया वेरेहम, केट क्रॉस, एकता बिश्त, शुभा सतीश, एस मेघना, सिमरन बहादूर, सोफी मोलिनक्स, नादिन डी क्लर्क.

  • गुजरात जायंट्स - ॲश्ले गार्डनर, बेथ मूनी, दयालन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम एमडी, स्नेह राणा, तनुजा कंवर, फोबी लिचफिल्ड, मेघना सिंग, त्रिशा पूजाथा, सायली सतघरे, प्रिया मिश्रा, कॅथरीन ब्रायस, मन्नत कश्यप, वेदा कृष्णमुर्ती, तरान्नूम पठाण, ली ताहुहू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa Today News Live: 'गोवा फॉरवर्ड'चा बुधवारी डिचोलीत जनता दरबार..!

Stray Dogs In Goa: भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले; किनारे बनले असुरक्षित

Shiroda News: शिरोड्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा

Cape News: सांडपाण्याची डबकी, सोकपिट भरले, झाडेझुडपे वाढली; केपे बाजार दुर्गंधीमय

SCROLL FOR NEXT